Deepika Padukone Hospitalised 
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: दीपिका पादुकोण मुंबईतील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट

Deepika Padukone Hospitalised: दीपिका पदुकोण गरोदर असून तिला मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लवकरच रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांना गुडन्यूज मिळणार आहे.

Bharat Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले आहे. दीपिका गरोदर असून आज तिला प्रसृती कळा जाणवून लागल्या त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपिका सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देऊ शकते, अशा बातम्या माध्यमात येत होत्या. आता दीपिकाला मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे.

दीपिका-रणवीरने शुक्रवारी घेतलं सिद्धिविनायकांचं दर्शन

गणेश चतुर्थीच्या एका दिवसाआधी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. सिद्धीविनाय मंदिरात जात त्यांनी गपणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. यावेळी दीपिकाने पारंपारिक लूकमध्ये आली होती. तिने हिरव्या रंगाची सिल्क साडी घातली होती. तर रणवीर सिंहने पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजमा परिधान केला होता.

याच हॉस्पिटलमध्ये झालाय रणबीर-आलियाच्या मुलीचा जन्म

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा मुलगा राहा कपूरचाही जन्म मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात झालाय. रणबीर आणि आलिया भट्ट यांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या वेळी अभिनेत्री गरोदर होती. लग्नाच्या सात महिन्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टने मुलीला जन्म दिलाय.

दीपिकाचं रणवीर सिंहसोबत मॅटर्निटी फोटोशूट

दीपिका पादुकोण गरोदर राहिल्यानंतर तिने हृदयस्पर्शी फोटो शूट केलं होतं. ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये दीपिका तिचे पोट दाखवतांना दिसत आहे. एका इमेजमध्ये, दीपिका तिच्या बेबी बंपला पाहताना दिसत आहे. एका फोटोमध्ये रणवीरने तिचे पोट मागून धरले आहे आणि तिच्या खांद्यावर चुंबन घेताना दिसत आहे, तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ते एकत्र हसताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT