Deepika Padukone SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone : आई झाल्यानंतर महिनाभरातच कामावर परतली दीपिका, रणवीरनं शेअर केला व्हिडीओ

Deepika Padukone Work After Delivery : प्रेग्नन्सीच्या महिन्याभरातच दीपिका पादुकोणने पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. नेहमी आपल्या चाहत्यांसाठी ती पोस्ट करत असते. तिची सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. अलिकडेच दीपिका पादुकोण आई झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Ranveer Singh) मुलीला जन्म दिल्यानंतर महिनाभरातच कामाला सुरूवात केली आहे. रणवीर सिंगने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यात ती दोघ एकत्र दिसत आहेत. प्रेग्नन्सीनंतर दीपिकाने पहिली जाहिरात शूट केली आहे. ही जाहिरात पाहून दीपिकाचे चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तसेच नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दीपिका पादुकोणने 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला आहे. अद्याप तिच्या मुलीच्या नावाचा खुलासा झाला नाही आहे. घरी लक्ष्मी आल्यामुळे रणवीर सिंग प्रचंड खुश पाहायला मिळत आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह या कमाल जोडप सहा वर्षांनी आई-बाबा झालं.दीपिका पादुकोणने प्रेग्नन्सीमध्येही चित्रपटाचे शूटिंग केले आहे. तिचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दीपिका ॲक्शन झोनमध्ये पाहायला मिळत आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह प्रेक्षकांचे आवडते कपल आहे. त्या दोघांचा 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट खूप गाजला आहे.रणवीर नेहमी आपले दीपिकाासाठीचे प्रेम व्यक्त करताना पाहायला मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Bone Health: हाडं ठिसूळ किंवा कमकवूत झाली की शरीरात हे 5 मोठे बदल दिसून येतात

SCROLL FOR NEXT