Bhumi Pednekar Trolled Instagram
मनोरंजन बातम्या

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकर पुन्हा एकदा ट्रोल, नेटकरी म्हणाले, 'कपडे घातले की, कचऱ्याची पिशवी?'

भूमीने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्या पार्टीत घातलेल्या कपड्यांमुळे ती ट्रोल झाली आहे.

Chetan Bodke

Bhumi Pednekar Trolled: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. भूमी जेवढी आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत नाही त्याहून अधिक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. पण यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. यावेळी भूमी आपल्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे.

यावेळी भूमीने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्या पार्टीत घातलेल्या कपड्यांमुळे ती ट्रोल झाली. मुंबईत झालेल्या नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमात तिने हजेरी लावली होती. पार्टीसाठी भूमीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या पार्टीतला तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे.

यावेळी भूमीला नेटकऱ्यांनी खूप वाईट पद्धतीने ट्रोल केले आहे. कोणी भूमीच्या ड्रेसला कचऱ्याच्या पिशवीची उपमा दिली आहे तर एकाने तिला चांगला ड्रेस डिझाईनर शोधून देण्याची मागणी केली आहे. सोबतच तिने गेल्या काही दिवसांपूर्वी ओठांची सर्जरी केली होती, त्यावरून ही तिला ट्रोल केले. तर भूमीला काहींनी उर्फी जावेदसोबत तुलना करत ट्रोल केले.

नुकतेच भूमीने बॉलिवूडचं क्यूट कपल सिद्धार्थ- कियाराच्या रिसेप्शन पार्टीलाही तिने हजेरी लावली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला बरंच ट्रोल केले होते. सोबतच तिच्या आणखी एका कृत्याने तिला ट्रोल केले जात होते. एका व्यक्तीला तिने किस केल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत होती. अनेकांनी कदाचित तो तिचा बॉयफ्रेंड असावा असा अंदाज बांधला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT