Adah Sharma Move Into SSR Apartment Saam TV
मनोरंजन बातम्या

Adah Sharma News : सुशांत सिंह राजपूतच्या घरी शिफ्ट झाली अदा शर्मा, म्हणाली, 'या घरात मला...'

Adah Sharma Move Into SSR Apartment : मुंबईतल्या बांद्रातील माँट ब्लँक अपार्टमेंटमध्ये अदा शर्माने सुशांत राजपूतचं घर भाड्याने घेतले आहे. याबद्दलची माहिती तिने स्वत: मुलाखतीमध्ये दिली आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने जून २०२० मध्ये त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यामुळे अनेक जण ते घर घेण्यासाठी नकार देत होते. अशातच गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा हे घर विकत घेणार अशी चर्चा सुरू होती. अखेर तिने हे घर खरेदी केली असून गेल्या काही दिवसांपूर्वीच ती त्या घरामध्ये शिफ्ट झाली आहे. मुंबईतल्या बांद्रामध्ये माँट ब्लँक अपार्टमेंटमध्ये अभिनेत्रीने हे नवं घर भाड्याने घेतले आहे. याबद्दलची माहिती तिने स्वत: मुलाखतीमध्ये दिली आहे.

'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अदा शर्माने सांगितले की, " मी गेल्या चार महिन्यांपूर्वीच बांद्रातील माँट ब्लँक अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले. मी, माझी आई आणि माझी आजी आम्ही तिघीही या घरात शिफ्ट झाले आहे. पण मी 'बस्तर' थिएटर रिलीज आणि 'द केरळ स्टोरी' या ओटीटी रिलीजच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. त्यानंतर मी काही दिवस मथुरेतील एलिफंट सेंच्युरीमध्ये राहिले. आता सर्व बिझी शेड्युल्डमधून मी फ्री झाले आहे. नुकतेच या घरात मी सेटल झाले आहे."

मुलाखतीमध्ये पुढे अदा शर्माने सांगितले की, "अनेकांनी मला त्या घरामध्ये राहायला जाण्यासाठी नकार दिला होता, तर अनेक रोखण्याचाही प्रयत्न केला होता. पण तरीही अखेर या घरात मी शिफ्ट झाले आहे. मी आतापर्यंत बांद्राच्या पाली हिल भागामध्ये एकाच घरात राहिले आहे. पहिल्यांदाच मी त्या घरातून शिफ्ट झाले आहे. कुठेही गेले तरीही पॉझिटिव्हनेस यायला हवा." यावेळी अभिनेत्रीने केरळ आणि मुंबईतील घराबद्दलचे काही किस्साही सांगितले. घरातील पॉझिटिव्हनेसचा विचार करत मी या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्याचे तिने सांगितले. अदाने पाच वर्षांसाठी हे अलिशान घर भाड्याने घेतले असून ऑक्टोबर २०२३ मध्ये तिने हे घर खरेदी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

Maratha Reservation: छगन भुजबळांच्या नाराजीवर सुनील तटकरे म्हणाले.. VIDEO

OBC Reservation: भाजपचे ४, शिवसेना-राष्ट्रवादीचे २- २ सदस्य; ओबीसी समाजाची उपसमिती काय काम करणार?

Tapalwadi Waterfall : पावसात लांब कशाला? मुंबईतच वसलाय स्वर्गाहून सुंदर टपालवाडी धबधबा

SCROLL FOR NEXT