Shahid Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Misha Birthday Celebration: शाहिद कपूरच्या मुलीच्या बर्थडे पार्टीत एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरची मुलं तैमूर आणि जेह सहभागी?

बॉलिवूड अभिनेते शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांनी त्यांची मुलगी मीशा कपूरच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेते शाहिद कपूर(Shahid Kapoor) आणि मीरा कपूर(Mira Kapoor) यांनी त्यांची मुलगी मीशा कपूरच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी टाऊनचे सर्व सेलेब्स आपल्या मुलांसोबत हजेरी लावण्यासाठी पोहोचले. मिशा कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या पार्टीत शाहिद कपूरची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर खानची नणंद सोहा अली खानही तिच्या कुटुंबासह उपस्थित होती.

खरं तर, शाहिद कपूर आणि कुणाल खेमू खूप चांगले मित्र आहेत. अशा परिस्थितीत सोहा आणि कुणाल त्यांची मुलगी इनायासोबत या किड्स पार्टीमध्ये सहभागी झाले होते. सोहा अली खानला तिथे पाहिल्यानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर खान त्यांची मुले तैमूर आणि जेहही या पार्टीत सहभागी होते की नाही, अशी चर्चा नेटिझन्स करत आहेत. परंतु करीना कपूर खान आणि तिचं कुटुंब या पार्टीला गेले नव्हते.

शाहिद आणि मीराची मुलगी मीशा कपूर २६ ऑगस्टला ६ वर्षांची झाली. मीशा बॉलिवूडच्या क्यूट स्टार किड्सपैकी एक आहे. प्रत्येक वेळी शटरबग्स लहान मिशाला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करतात, मीशाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होत असतात. शुक्रवारी, शाहिद आणि मीराने त्यांची मुलगी मीशासाठी मुंबईत एक सुंदर वाढदिवसाची पार्टी दिली होती. पाहुण्यांच्या यादीत नीलिमा अझीम, पंकज कपूर, सुप्रिया पाठक, करण जोहरची मुले यश आणि रुही त्याचबरोबर सोहा अली खान आणि कुणाल खेमूची मुलगी इनाया नौमी खेमू यांच्यासह अनेक स्टार किड्सचा समावेश होता.

अभिनेता ईशान खट्टरही त्याच्या भाचीच्या वाढदिवसाच्या पार्टीचा आनंद लुटताना दिसला. गोंडस बाहुलीप्रमाणे परिधान केलेल्या गुलाबी फुलांच्या फ्रॉकमध्ये मीशा खूप क्यूट दिसत होती. त्याचबरोबर काका ईशानने ही गुलाबी रंगाचा टीशर्ट घातला होता. शाहिद कपूरची आई नीलिमा अझीमही तिच्या नातीच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाली होती. मीशाच्या वाढदिवसाच्या पार्टीत पंकज कपूर पत्नी सुप्रिया पाठक आणि मुलगी सना कपूरसोबत सहभागी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT