Vidyut Jammwal Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vidyut Jammwal Video: बर्फानंतर आता ज्वालामुखीच्या चिखलामध्ये विद्युत जामवालने केली अंघोळ, VIDEO पाहून नेटिझन्स म्हणाले 'मडमॅन'

Vidyut Jammwal and Volcanic Mud Video Viral: विद्युतचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.

Priya More

Vidyut Jammwal's Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) आपल्या फिटनेस, स्टंट यामुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये सर्वांत खतरनाक स्टंट करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये विद्युतचे नाव घेतले जाते. विद्युत जामवालला चित्रपटामध्ये स्टंट करताना तुम्ही पाहिले असेल. पण खऱ्या आयुष्यामध्ये देखील तो हे खतरनाक स्टंट करतो. याची प्रचिती तुम्हाला त्याचे सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून आलाच असेल.

आपल्या कल्पनाशक्तीच्या पलिकडे विद्युत काहीना काही तरी नवीन करत असतो. एका वर्षापूर्वी विद्युतने बर्फामध्ये अंघोळ केली होती. आता तर त्याने चक्क मातीच्या ज्वालामुखीमध्ये अंघोळ केली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्युतचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.

विद्युत जामवालने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो ज्वालामुखीच्या चिखलात म्हणजेच वोलकॅनिक मडमध्ये अंघोळ करताना दिसत आहे. विद्युतने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याचे फायदे देखील सांगितले आहेत. 'MUD VOLCANO/मातीच्या ज्वालामुखी' असे त्याने व्हिडीओला कॅप्शन दिले आहे.

त्याने पुढे असे लिहिले आहे की, 'ज्वालामुखीय चिखल हे ज्वालामुखीच्या राखेसह गरम पाण्याच्या झऱ्याचे मिश्रण करते. मातीचा ज्वालामुखी कित्येक शंभर मीटरपासून काही किलोमीटरपेक्षा जास्त खोलीवर फुटते. ज्वालामुखीच्या मातीतून उगम पावणारा गाळ मुख्यतः पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली गरम पाण्याच्या तापमानामुळे तयार होतो. या मातीत सल्फर, सिलिका, जस्त आणि मॅग्नेशियमसह अनेक खनिजाने समृद्ध असते.'

विद्युतने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये काही दिवसांपूर्वी बर्फामध्ये केलेली अंघोळ आणि आता मातीच्या ज्वालामुखीमध्ये केलेली अंघोळ दिसत आहे. विद्युतच्या या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटिझन्सनी त्याचे नाव 'मडमॅन' ठेवले आहे. विद्युतच्या या व्हिडीओला साडेपाच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

विद्युत जामवालने हे असं काही करण्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्षभरापूर्वी विद्युत शूटिंगच्या निमित्ताने काश्मीरला गेला होता. जिथे त्याने -८ अंशांवर बर्फाळ पाण्यात डुबकी मारली होती. त्याचा हा व्हिडीओ देखील त्यावेळी तुफान व्हायरल झाला होता. अभिनयासोबतच विद्युत जामवाल त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. अभिनेता असण्यासोबतच विद्युत जामवाल मार्शल आर्टिस्ट देखील आहे. विद्युतने 25 हून अधिक शोमध्ये लाइव्ह अॅक्शन केली आहे.

विद्युत जामवालने वयाच्या तिसऱ्या वर्षी मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली होती. एवढेच नाही तर त्याने मार्शल आर्ट्समधून पदवीही घेतली आहे. भारताव्यतिरिक्त, विद्युत हा त्याच्या फिटनेस आणि मार्शल आर्टसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो. विद्युत जामवालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच 'शेर सिंग राणा' आणि 'क्रॅक' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनेता विद्युत जामवालने 'कमांडो', 'सनक', 'खुदा हाफिज' यासारख्या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT