Tiger Shroff House Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger Shroff House: टायगर झाला पुणेकर, खरेदी केलं आलिशान घर; किंमत जाणून थक्क व्हाल

Tiger Shroff: टायगर मुंबईत एका आलिशान 8 बीएचके घरात राहतो. मात्र आता त्याने पुण्यात घर विकत घेतल्याचे वृत्त आहे.

साम टिव्ही ब्युरो

Tiger Shroff House In Pune :

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता टायगर श्रॉफ हा सध्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार दिसणार आहे. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर दिसणार आहेत. मात्र बातमी त्यांच्या चित्रपटाची नाही आहे, तर यापेक्षा जरा वेगळी आहे.

टायगर मुंबईत एका आलिशान 8 बीएचके घरात राहतो. मात्र आता त्याने पुण्यात घर विकत घेतल्याचे वृत्त आहे. त्यासाठी त्याने मोठी किंमत मोजली आहे. त्याने यासाठी नोंदणी करत 5 मार्च 2024 रोजी स्टांप ड्यूटी भरल्याची माहितीही समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, या घराची किंमत 7.5 कोटी रुपये आहे. हे घर 4,248 स्क्वेअर फूटमध्ये बांधले गेले आहे. यासाठी अभिनेत्याने 52.5 लाख रुपये स्टांप ड्यूटी भरली आहे. हे घर त्याने साडेतीन लाख रुपये भाडेतत्त्वावर दिलं आहे. हे घर चेरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने भाड्याने घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.  (Latest Marathi News)

टायगर सध्या मुंबईतील खार येथे राहतो. या 8 बीएचके अपार्टमेंटची किंमत 35 कोटी रुपये आहे. सोशल मीडियावरील फोटोंच्या माध्यमातून त्याने अनेकवेळा आपल्या घराची झलक दाखवली आहे.

दरम्यान, टायगरने एका मुलाखतीत सांगितले होते की, जॅकी श्रॉफच्या प्रोडक्शनचा चित्रपट 'बूम' फ्लॉप झाल्यानंतर त्याला त्याचे घर विकावे लागले होते. तेव्हापासून घर घेण्यास त्यांचे नेहमीच प्राधान्य दिले आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत तोही सामील झाला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अक्षय कुमार आणि अजय देवगण देखील रिअल इस्टेटमध्ये खरेदी करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT