Sunny Deol In Gadar 2
Sunny Deol In Gadar 2 Instagram
मनोरंजन बातम्या

Sunny Deol In Gadar 2: ‘गदर २’ मधील सनी देओलचा नवीन लूक आला समोर; २३ वर्षांनी तारा सिंगला पाहताच फॅन्स म्हणाले...

Chetan Bodke

Gadar 2 Sunny Deol Look: सनी देओलच्या ‘गदर’ या सुपरहिट चित्रपटातील तारा सिंगची व्यक्तिरेखा प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून आहे. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे.

चित्रपटातील केवळ संवादच नाही तर कथाही लोकांना आठवते. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘गदर’च्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली. ‘गदर २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच सनी देओलने त्याचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

सनी देओलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘गदर २’ मधील त्याचा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आरशासमोर उभा असल्याचे दिसत आहे. सनी देओलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो तारा सिंगच्या लूकमध्ये परफेक्ट दिसत आहे. त्याच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर त्याने पिवळा टी-शर्ट आणि राखाडी रंगाची पगडी घातलेली दिसत आहे. सनीने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रिफ्लेक्शन’.(Entertainment News)

सध्या त्याच्या फोटोंवर युजर्सने ट्रोलिंगसोबतच त्याच्या लूकचे कौतुकही केले आहे. सर्वाधिक या लूकची ट्रोलिंग होत आहे. पाकिस्तानचा जावई पुन्हा येतोय... आमचा भाऊ तारा सिंग, असं म्हणत सनी देओलला ट्रोल केले आहे. सोबतच हिंदूस्थान झिंदाबाद म्हणत देखील ट्रोलिंग केली जात आहे. खंबीर तारासिंग म्हणून देखील त्याच्या लूकचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोबतच अनेक चाहते चित्रपटाबद्दल फार उत्सुक असल्याचे दिसत आहेत.(Latest Marathi News)

सनी देओलचा ‘गदर २’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ‘गदर’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २३ वर्षांनंतर या चित्रपटाची घोषणा झाल्यामुळे प्रेक्षक फार उत्सुक आहेत. चित्रपटात प्रमुख भूमिकेत सनी देओल सोबतच अमीशा पटेल देखील दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lal Salaam Released In Hindi : रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हिंदीमध्ये पाहायला मिळणार, कधी आणि कुठे होणार रिलीज?

Today's Marathi News Live: चिपळूण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, नदी, नाले तुडूंब

Pune Crime: प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या; धक्कादायक घटनेने पुणे हादरलं!

SRH vs PBKS: पंजाब की हैदराबाद; कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

Railway Crime : मनमाडला रेल्वे वॅगनमधुन इंधन चोरी; सहा रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT