K.L.Rahul And Athiya Shetty  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Athiya- Rahul Wedding: सुनील शेट्टीनेच दिली लेकीच्या लग्नाची माहिती; अथिया-राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू के.एल.राहुल दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Athiya- Rahul Wedding: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) आनंदाचे वातावरण आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रत्येक कलाकारांची जोडी आपल्या चाहत्यांना 'गुड न्युज' देत आहेत. त्यांच्या 'गुड न्युज' मुळे चाहत्यांना आनंद तर होतोच पण सोबतच, कलाकारांच्या मित्रांना, नातेवाईकांना ही सर्वाधिक आनंद होत आहे. काही कलाकार लग्नाची तर काही आपल्या आपल्या घरी नव्या पाहूण्याचे आगमन झाल्याची 'गुड न्युज' देत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची (Sunil Shetty) लेक अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू के.एल.राहुल दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत होती. सोशल मीडियावर दोघांच्याही फोटोंची बरीच चर्चा होत आहे. (Athiya Shetty)

अनेक दिवसांच्या होत असलेल्या चर्चेला अखेर पुष्टी मिळालेली आहे. सुनिल शेट्टीने अखेर आपल्या लेकीच्या लग्नाबद्दल मौन सोडले आहे. आथिया आणि के.एल.राहूलच्या लग्नाबद्दल माहिती सुनिलने एका कार्यक्रमात माहिती दिली आहे. (K.L.Rahul)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धारावी बॅंक' या वेब शोच्या कार्यक्रमादरम्यान पापाराझींसोबत संवाद साधताना लग्नाची माहिती दिली आहे. या कार्यक्रमादरम्यान काही पापाराझींनी प्रश्न विचारला त्यावेळी सुनिल म्हणाला, 'लवकरच होईल...' पंरतू बोलताना सुनिलने लग्नाची तारीख सांगितली नाही. अद्यापही तारीख गुलदस्त्यात कायम आहे. अखेर त्याच्या या विधानाने सर्वच ठिकाणी चर्चेला पुर्णविराम मिळेल हे नक्की.

आथिया आणि राहूल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा कित्येक दिवसांपासून होत आहे. दोघांना कित्येकदा लग्नाबद्दल विचारणा करण्यात आले होते. हे दोघे एकमेकांना तीन वर्षापासून डेट करत आहे. आथिया- राहूल २०२३ मध्ये लग्नबंधनात अडकण्याची कदाचित शक्यता आहे. परंतू लग्नाची माहिती दोघांच्याही कुटुंबाने अद्याप दिलेली नाही. लवकरच त्यांच्या लग्नाची माहिती त्यांच्या चाहत्यांना कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Shocking: पोलिस चौकीसमोर मर्डर; बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या, परिसरात खळबळ

Pune Car Accident : कोरेगाव पार्कात भयानक अपघात, कार वेगात मेट्रोच्या खांबाला धडकली, दोघांचा मृत्यू,थरारक CCTV व्हिडिओ

सोनं आजच खरेदी करा; २,६२० रूपयांनी स्वस्त, चांदीच्या दरातही कमालीची घट, जाणून घ्या लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT