Sidharth Malhotra SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sidharth Malhotra : सिद्धार्थ मल्होत्रा पापाराझींवर का भडकला? पाहा व्हायरल VIDEO

Sidharth Malhotra Video Viral: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा पापाराझींवर भडकताना दिसत आहे.

Shreya Maskar

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (kiara Advani) बॉलिवूडचे पावर कपल आहे. अलिकडेच त्यांनी आपण आई-बाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. या बातमीने चाहते देखील खूप आनंदी झाले होते. प्रेग्नेंसी जाहीर केल्यावर कियारा अडवाणी अनेक वेळा कामानिमित्त स्पॉट झाली आहे. सध्या सिद्धार्थ मल्होत्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ पापाराझींवर भडकताना दिसला.

बॉलिवूडची अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच आई होणार आहे. त्यामुळे ती अनेक वेळा बेबी बंप फ्लॉन्ट करताना स्पॉट होते. चाहत्यांना देखील तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला आवडतात. मात्र आता सिद्धार्थ मल्होत्राचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात तो पापाराझींवर खूप भडकला आहे. व्हिडीओमध्ये कियारा डोक्याला हात लावून गाडीमध्ये बसलेली पाहायला मिळत आहे. तिने गुलाबी रंगाचे शर्ट परिधान केले आहे. तेव्हा पापाराझी तिचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कियाराने हाताने चेहरा झाकला आहे. हे सर्व सुरू असताना गाडीच्या मागून सिद्धार्थ येतो आणि पापाराझींवर चिडताना दिसतो. तो पटकन पापाराझींना मागे जाण्यास सांगतो. त्यांच्यावर भडकतो. तसेच तो रागात पापाराझींना जरा नीट वागा असेही सांगतो. सिद्धार्थ मल्होत्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी 2023 मध्ये लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी सिद्धार्थ-कियारा आई-बाबा होणार आहेत. चाहते आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहात आहेत. या दोघांनी आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री गुलाबराव पाटलांना क्लिअरनेस मिळत नसल्याने उड्डाण रद्द

दोन तरुण अन् एक तरुणी लिफ्टमध्ये, अचानक मोठा स्फोट झाला, हादरवणारा थरार CCTV मध्ये कैद|VIDEO

राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा दु:खाचा डोंगर; माजी मंत्र्यांच्या वडिलांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Chanakya Niti: या 5 चुकांमुळे पुरुष होतात उद्ध्वस्त, संसारही टिकत नाही; चाणक्यांनी काय दिला सल्ला

फूड डिलीवरीवाल्यासोबत वाद; हेल्मेट आणि लाथाबुक्क्यांनी मारलं, व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT