Siddharth Malhotra Father Sunil Malhotra Dies:  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Siddharth Malhotra: 'तुम्ही नेहमीच माझ्यासोबत...'; वडिलांच्या निधनानंतर सिद्धार्थ मल्होत्राची पहिली भावनिक पोस्ट

Siddharth Malhotra Father Sunil Malhotra Dies: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने त्याच्या वडिलांच्या आठवणीत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Shruti Vilas Kadam

Siddharth Malhotra Father Sunil Malhotra Dies:  सिद्धार्थ मल्होत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. १४ फेब्रुवारी रोजी त्याचे वडील निधन झाले. सिद्धार्थने इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्याच्या दिवंगत वडिलांची आठवणींना उजाळा देणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धार्थने त्याच्या दिवंगत वडिलांसाठी केली भावनिक पोस्ट

मंगळवारी रात्री सिद्धार्थ मल्होत्राने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली, यामध्ये त्याने त्याच्या वडिलांसोबतचे अनेक जुने फोटो शेअर केले. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, "ते प्रचंड प्रामाणिक, खरे आणि मूल्य जपणारे व्यक्ती होते. ते त्यांच्या मूल्यांनुसार जगले, कधीही झुकले नाही. त्यांनी आम्हाला कठोर न होता शिस्त शिकवली. त्यांनी आम्हाला अहंकाराशिवाय शक्तीचा अर्थ दाखवला. आयुष्याने त्यांची खूप परीक्षा घेतली तरीही तो नेहमीच सकारात्मक राहिले."

माझे तुमच्यावर फार प्रेम आहे...

सिद्धार्थ मल्होत्राने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, "मर्चंट नेव्ही कॅप्टन म्हणून समुद्रावर कमांड देण्यापासून ते शांत धैर्याने आजाराचा सामना करण्यापर्यंत, त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांनी कधीही आपली शालीनता गमावली नाही. बाबा, तुमचा प्रामाणिकपणा हा माझा वारसा आहे. तुमची शक्ती मला दररोज मार्गदर्शन करते. तुमची सकारात्मकता अजूनही या कुटुंबाला एकत्र ठेवते. तुम्ही आम्हाला तुमच्या झोपेत शांतपणे सोडून गेलात, पण तुम्ही मागे सोडलेली शिकवण मोठी आहे. मी जो आहे तो तुमच्यामुळे आहे आणि मी तुमचे नाव, तुमची मूल्ये आणि तुमचा प्रकाश नेहमीच पुढे नेईन. बाबा, माझे तुमच्यावर फार प्रेम आहे.

सिद्धार्थ कियारासोबत दिल्लीत आहे

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांचे शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी दिल्लीत निधन झाले. अभिनेता त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीला गेला. सिद्धार्थची पत्नी, अभिनेत्री कियारा अडवाणी देखील ही बातमी मिळताच दिल्लीला गेली. सिद्धार्थचे वडील बऱ्याच काळापासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्याने लिली सिंगच्या पॉडकास्टवर त्याच्या वडिलांच्या आजाराचा उल्लेख केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT