Salman Khan And Shah Rukh Khan Next Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3: 'चिंगम नहीं पेनकिलर...', बॉलिवूडचे 'करण अर्जुन' पुन्हा एकत्र येत करणार नव्या चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा

लवकरच सलमान त्याच्या आगामी 'टायगर ३' चित्रपटाच्या शूटिंगसाठी सुरुवात करणार आहे.

Chetan Bodke

Tiger 3 Shooting: नुकताच शाहरुखच्या 'पठान' ने बॉक्स ऑफिसवर नुकतीच १००० कोटींची कमाई केली आहे. शाहरुख आणि सलमानला एकत्र पाहून प्रेक्षकांना बराच आनंद झाला. या जोडीला बॉलिवूडमधील 'करण अर्जुन ' म्हणून संबोधतात. आता लवकरच ही जोडी 'टायगर ३' मध्ये एकत्र दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सुरुवात होत आहे.

सलमानचा २०१३ मध्ये 'एक था टायगर ' आला होता. तर, २०१७ मध्ये ' टायगर झिंदा है ' प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांत सलमानसोबत कतरिना कैफ दिसली होती. सलमानसोबत 'टायगर ३'मध्ये शाहरुख दिसणार असून काही नवे चेहरे देखील दिसणार आहेत. शाहरुखच्या 'पठान'मध्ये सलमानने पाहुणा कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची शूटिंग मुंबईत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार आहे.

शाहरुखच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, शाहरुख शेवटचा 'झिरो' या चित्रपटात झळकला होता. पण त्यानंतर शाहरुख काही चित्रपटांमध्ये खूप छोट्या छोट्या भूमिकेतही दिसला होता. गेल्या काही वर्षांमध्ये या दोघांमध्ये काही वाद झाल्याने यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. ते एकमेकांसोबत साधे बोलत ही नव्हते. मात्र यांच्यात आता कोणतेच वाद नसल्याने ते एकत्र अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात.

‘पठान’मध्ये असे दाखवण्यात आले आहे की सलमान एका मिशनवर जातो. या मिशन दरम्यान दोघांची भेट होणार असे बोलले जात आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मनीषा शर्मा दिग्दर्शित 'टायगर ३'मध्ये सलमान खान, शाहरुख खान, इम्रान हाश्मी, कतरिना कैफ दिसणार आहे. शाहरुख लवकरच 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा फडणवीस सरकारला घेरणार, दसरा मेळाव्यात करणार मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana: ओटीपी येतोय, पण केवायसी प्रक्रिया पूर्ण होतच नाही, लाडक्या बहि‍णींपुढे नवे संकट, काय करावे?

Maharashtra Dasara Melava Live Update : देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज - मोहन भागवत

IND vs WI: 347 दिवसांनंतर 'या' गेमचेंजर खेळाडूची अखेर टीममध्ये एन्ट्री; पाहा वेस्ट इंडिजविरूद्ध कशी आहे प्लेईंग 11

Satara Tourism : साताऱ्याला गेल्यावर करा ट्रेकिंगचा प्लान, दिवसभर होईल धमाल-मस्ती

SCROLL FOR NEXT