आर्यन खान Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aryan Khan: आर्यन खान करणार लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण, साकारणार 'ही' भूमिका...

स्टारकिड आर्यन खान करतोय बॉलीवूडमध्ये एन्ट्री, अभिनेता न होण्याचा घेतला निर्णय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) आणि नेपोटीजम याची नेहमीच चर्चा होत असते. मागील काही वर्ष या विषयावर मोठ्या प्रमाणत बोललं आणि लिहिलं जात आहे. वेगवेगळ्या माध्यमातून स्टारकिडवर टीका सुद्धा केली जात आहे. शाहरुखचा खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान यांच्या अटकेचे प्रकरण बरेच गाजले होते. ड्रग्स प्रकरणात अडकल्याने त्याच्यावर भरपूर टीका झाली होता. इतर स्टारकिडसोबत त्याची तुलनाही करण्यात आली. आर्यन खान या आरोपातून मुक्त जरी झाला असला तरी त्याच्या आरोपांबद्दल चर्चा अजूनही सुरूच आहे.

आर्यन खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा बरीच वर्ष सुरू आहे. शाहरुख इतर स्टारकिडप्रमाणे आर्यनलाही मोठ्या चित्रपटातून लाँच करणार असल्याची चर्चा तुम्हीही ऐकली असेल. शाहरुख खानची मुलगी सुहाना झोया अख्तरच्या वेबसीरीजमधून पदार्पण करणार आहे. परंतु आर्यन खानच्या बॉलीवूड डेब्यूविषयी अजूनही चर्चा झालेली नाही.

आर्यन खान लवकरच आपल्याला लेखकाच्या भूमिकेत म्हणून दिसणार आहे. एका वेबसीरीजचे (Web Series) त्याने लेखन केले आहे. या वेबसीरीजच्या पात्रांचे ऑडिशन सुरू झाले आहे. आर्यन खान लिखित वेबसीरीज या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लेखक बिलाल सिद्दीकी, ज्यांनी नेटफ्लिक्स शो 'बार्ड ऑफ ब्लड'चे सह-लेखन केले आहे. बिलाल सिद्दीकी आर्यनसोबत या प्रकल्पावर काम करत आहेत.

शाहरुख खान, रेड चिलीज किंवा आर्यन खान यांच्याकडून अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आर्यनने परदेशातून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले आहे. आर्यनला दिग्दर्शन आणि लिखाणात जास्त आवड असल्याचे शाहरुखने स्वतः सांगितले आहे. एका अभिनेत्याच्या मुलगा अभिनेता न होता लेखक होणार आहे. हे बॉलीवूडमध्ये फार क्वचितच पाहायला मिळते. लेखकाच्या भूमिकेतील आर्यन खान चाहत्यांना आवडतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT