Sajid Khan Passed Away: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sajid Khan Passed Away: अभिनेता साजिद खानने घेतला जगाचा निरोप, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

Satish Kengar

Sajid Khan Passed Away:

मेहबूब खान यांच्या मदर इंडिया या चित्रपटात सुनील दत्तच्या बिरजूची बालपणीची भूमिका साकारणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते साजिद खान यांचे निधन झाले आहे. या अभिनेत्याने 'माया' आणि 'द सिंगिंग फिलिपिना' सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही काम केलं होतं. कर्करोगामुळे वयाच्या ७० व्या त्यांचं निधन झालं.

साजिद खान यांचा एकुलता एक मुलगा समीर याने पीटीआयला सांगितले की, ते काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. 22 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. समीरने सांगितले की, त्याचे वडील दुसऱ्या पत्नीसोबत केरळमध्ये राहत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याने सांगितले, माझ्या वडिलांना राजकुमार पितांबर राणा आणि सुनीता पितांबर यांनी दत्तक घेतले होते. त्यांचे पालनपोषण चित्रपट निर्माता मेहबूब खान यांनी केले होते. ते काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहून लोकांच्या कल्याणासाठी काम करत होते. ते अनेकदा केरळला जायचे आणि नंतर तिथेच ते लग्न करून स्थायी झाले.  (Latest Marathi News)

केरळमध्ये झाले अंत्यसंस्कार

त्यांच्या मुलाने पुढे माहिती दिली की, साजिद खान यांना केरळमधील अलप्पुझा येथील कायमकुलम टाऊन जुमा मशिदीत दफन करण्यात आले. दर्म्य, मदर इंडियाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. मेहबूब खानच्या 'सन ऑफ इंडिया'मध्ये साजिद खान यांनी मुख्य भूमिका साकारली होती. अमेरिकन टीव्ही शो 'द बिग व्हॅली'च्या एका एपिसोडमध्ये ते पाहुण्यांच्या भूमिकेत दिसले होते. याशिवाय 'इट्स हॅपनिंग' या म्युझिक शोमध्ये ते गेस्ट जज म्हणून दिसले होते.

साजिद खान फिलिपिन्स देशातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अभिनेत्री नोरा औनोरसोबत 'द सिंगिंग फिलिपिना', 'माय फनी गर्ल' आणि 'द प्रिन्स अँड आय' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मर्चंट-आयव्हरी प्रोडक्शन 'हीट अँड डस्ट'मध्येही त्यांनी एका डाकूची भूमिका साकारली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

Fashion Tips : बॅगी जीन्ससोबत ट्राय करा 'हे' टॉप्स, फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

SCROLL FOR NEXT