Saif Ali Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan: फायटर सैफ अली खान आज घरी परतणार, वाचा हेल्थ अपडेट

Saif Ali Khan Discharged Update : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्याला आज डिस्चार्ज मिळणार आहे. त्याच्या प्रकृतीचे हेल्थ अपडेट जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूडचा फायटर अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) सध्या रुग्णालयात दाखल आहे. मात्र त्याला आज डिस्चार्ज मिळणार असल्याचे बोले जात आहे. सैफ अली खानवर 16 जानेवारीला हल्ला करण्यात आला. त्याच्या घरात चोर शिरून त्याने सैफवर चाकूने वार केले. यात सैफ अली खान गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाला. हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सैफवर हा हल्ला त्याच्या बांद्रे येथील घरात करण्यात आला होता. हल्ल्यानंतर सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया चाकूचा तुकडा सैफच्या शरीरातील काढण्यात आला आहे. त्यानंतर प्रकृती चांगली होईपर्यंत त्याला आयसीयूमध्ये स्पेशल रुममध्ये शिफ्ट करण्यात आले. सैफ निडरपणे या हल्ल्याला सामोरे गेला होता.

सैफ हेल्थ अपडेट

मीडिया रिपोर्टनुसार, सैफ अली खानची तब्येत आता ठीक आहे. त्याच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधार होत जात आहे. आता सर्वांचे लक्ष सैफला डिस्चार्ज कधी मिळणार, याकडे आहे. सैफ अली खानची तब्येत आता पूर्वीपेक्षा खूपच चांगली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आज डॉक्टर सैफ अली खानला डिस्चार्ज देणार असल्याचे सर्वत्र बोले जात आहे. मात्र जोपर्यंत सैफ पूर्ण बरा होत नाही तोवर त्याला घरीसुद्धा बेड रेस्टचा सल्ला देण्यात आला आहे.

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद इलियास शरीफुल इस्लाम शहजादला अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी 30 वर्षांचा असून तो बांग्लादेशाचा नागरिक आहे. तसेच तो एक कुस्तीपटू देखील आहे. पोलीस चौकशीत अनेक खुलासे होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

Rain Flood : निसर्गाचं रौद्ररूप! मुसळधार पावसात जनजीवन विस्कळीत, ४४ नागरिकांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये 4000 वारकऱ्यांची सायकलवारी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

SCROLL FOR NEXT