Ved Marathi Movie Poster Instagram/ @riteishd
मनोरंजन बातम्या

Ritesh Deshmukh New Movie: वेडेपणा करायला मुहूर्त नसतो... रितेश देशमुखनं मुहूर्त साधला, 'वेड' लावणारा फर्स्ट लूक पाहा!

'लय भारी' चित्रपटाच्या माध्यमातून त्याने मराठी चित्रपटात पदार्पण केले होते. रितेश दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नव्या इनिंगला सुरुवात करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ritesh Deshmukh New Movie: रितेश देशमुखचे चित्रपट नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस येतात. तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो, त्याच्या फोटोंमुळे तो बराच चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या रिल्सही बनवत असतो, त्याच्या रिल्स ने सर्वांना वेड लावले आहे. तो नेहमीच रिल्सवरुन सोशल मीडियावर चर्चेत असतो.

त्याने आपल्या उत्तमोत्तम अभिनयाने मराठीतच नाही तर बॉलिवूड मध्ये ही आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे. त्याने आपल्या चित्रपटांची सुरुवात बॉलिवूडमधुन केली होती. आता तो मराठी चित्रपटातही अभिनय करतो.

'लय भारी' चित्रपटाच्या माध्यमातून त्याने मराठी चित्रपटात पदार्पण केले होते. रितेश दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. त्यामुळे सध्या त्याच्या नव्या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे.

रितेशने आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचे जाहीर केले होते. मुख्य म्हणजे रितेश मराठी चित्रपटांतून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असल्याने त्याच्या चाहत्यांना याचे सर्वाधिक आनंद होत आहे.

रितेश आपल्या लाडक्या माय-बाप रसिकांसाठी खास भेट घेऊन आला आहे, रितेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी 'वेड' चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर केला आहे. पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केल्याने फार आनंद होत असल्याची प्रतिक्रिया रितेशने दिली आहे.

चित्रपटाचा पहिला वहिला पोस्टर पाहता चित्रपटाची शैली ही प्रेमकहाणी आणि थ्रिलर असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाचा पहिल्या पोस्टरला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटात रितेशसोबत जेनेलियाही झळकणार आहे. रितेश जेनीलियाचा हा ‘वेड’ चित्रपट ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. चित्रपटात कोण-कोणते कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Beed Crime : मुंडेंच्या मुलाला कराड समर्थकाची मारहाण, ट्युशनवरून येताना अडवले अन्...

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

SCROLL FOR NEXT