Alia And Ranbir Daughter Raha Kapoor Pics Instagram
मनोरंजन बातम्या

Raha Kapoor Pics: गुबगुबीत गाल अन् गोंडस चेहरा; रणबीर-आलियाच्या लाडक्या लेकीचा VIDEO आला समोर

Raha Kapoor News: पुन्हा एकदा रणबीर-आलियाची गोंडस लेक राहा पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर स्पॉट झाली आहे.

Chetan Bodke

Raha Kapoor Pics

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)च्या लेकीची सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. ख्रिसमसच्या दिवशी पहिल्यांदा रणबीर- आलियाने मीडियासमोर लेक राहाला आणलं. जवळपास १४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रणबीर आणि आलियाने राहाचा चेहरा चाहत्यांना दाखवला. नुकतंच पुन्हा एकदा राहा पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर स्पॉट झाली आहे. सध्या तिचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. (Bollywood)

नुकतंच आपण सर्वांनी न्यू इयरचं सेलिब्रेशन दणक्यात केलं. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही नववर्षाच्या स्वागतासाठी परदेशामध्ये गेले होते. रणबीर, आलिया आणि लेक राहा सुद्धा न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी परदेशाध्ये गेले होते. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विमानतळावरून बाहेर पडताना पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, रणबीरच्या हातात राहा दिसते. यावेळी राहाने गुलाबी रंगाच्या हुडीमध्ये ती स्पॉट झाली. (Bollywood News)

राहाच्या निळ्या डोळ्यांचे आणि तिच्या सौंदर्याचे नेटकरी कौतुक करीत आहे. राहाच्या क्यूटनेसची आजही नेटकऱ्यांमध्ये होताना दिसत आहे. राहाचा चेहरा तिचे आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखा दिसत असल्याचं अनेक जण म्हणाले, तर तिचे डोळे तिचे पणजोबा राज कपूर यांच्यासारखे दिसत असल्याचं चाहते म्हणाले आहेत.

राहाचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ ला झाला आहे. दोघांनीही पापाराझींना मुलीचा चेहरा दाखवायचा नाही, अशी विनंती केली होती. पण अखेर तिने आपल्या लेकीची पहिली झलक दाखवल्यानंतर सर्वांनीच तिच्या क्यूटनेसचे कौतुक केले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: शाळेतील बोर्ड मिटिंगमध्ये अचानक कपडे काढू लागली महिला, अधिकारी पाहतच राहिले; VIDEO व्हायरल

Mira-Road : धक्कादायक! मिरा रोडमध्ये गरब्यात फेकली अंडी, तणाव वाढला | VIDEO

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT