Nawazuddin Siddiqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: बान नजरेतला..बनारसी शालू, कपाळावर टिकली..; कोण म्हणेल हा नवाजुद्दीन आहे? लूक बघून चक्रावून जाल!

नवाजुद्दीन त्याच्या आगामी चित्रपटातील 'हड्डी'मधील ट्रान्सजेंडरच्या भूमिकेने चांगलाच चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या कौशल्यावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. सोबतच नवाजुद्दीन सिद्दीकीला मनोरंजनसृष्टीत एक यशस्वी अभिनेता म्हणून देखील ओळखले जाते. खलनायक असो किंवा सकारात्मक व्यक्तिरेखा नवाजुद्दीन हा नेहमीच त्याच्या व्यक्तिरेखेत नेहमीच जीव ओतून काम करताना दिसतो. नवाजुद्दीन त्याच्या आगामी चित्रपटातील 'हड्डी'मधील ट्रान्सजेंडरच्या भूमिकेने चांगलाच चर्चेत आला आहे.

आत्तापर्यंत या चित्रपटातून अभिनेत्याचे दोन लूक समोर आले आहेत. नुकतेच शेअर करण्यात आलेल्या तिसऱ्या लूकमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 'हड्डी' चित्रपटातील नवाजुद्दीनचा लेटेस्ट लूक झी स्टुडिओने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बनारसी साडी, कपाळावर टिकली, रत्नजडीत दागिने आणि डोळ्याने घायाळ करणारे सौंदर्य दिसत आहे.

नवाजुद्दीनने ही पोस्ट शेअर करत त्याला कॅप्शनही तितकच भारी दिलं आहे. फोटो शेअर करत त्यानं लिहिलंय, "गिरफ़्तार तेरी आँखो में हुवे जा रहे हैं हम,जीना नहीं है फिर भी जिये जा रहे हैं हम." फोटोत तो कुणाकडे तरी पाहतांना दिसतोय. त्याच्या नजरेतील अदा चाहत्यांना खुप आवडत आहे.'हड्डी'च्या या नव्या लूकमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला पहिल्या नजरेत ओळखणे खरोखरच अवघड आहे.

सध्या ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. चाहते केवळ त्याच्या अभिनयाचेच कौतुक करत नाहीत तर त्याच्या लूकवरही थक्क झाले आहेत. चाहते फोटोवर प्रतिक्रिया देत म्हणतात की, तुझ्या कातील करणाऱ्या नजरेत आम्ही अडकलो आहेत.

तर दुसऱ्याने कमेंट केली, 'नजकत से नवाज बेगम', आणखी एक जण म्हणतो, 'तुझा हा फोटोपाहून कोणीही म्हणू शकत नाही की हे पात्र पुरुषाने साकारले आहे.' याशिवाय काही युजर्स अर्चना पूरण सिंहबद्दल मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत.

'हड्डी' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाचे लेखन अदम्य भल्ला आणि अक्षत अजय शर्मा यांनी एकत्र केले आहे. तर अक्षत अजय शर्मा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'हड्डी' हा चित्रपट 23 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT