Bigg Boss Marathi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकराच्या सपोर्टमध्ये उतरला बॉलिवूडचा अभिनेता, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला..

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात आपला चांगला गेम दाखवत आहे. सर्वत्र त्यांची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. अशात एका बॉलिवूड अभिनेत्याने वर्षा ताईंचे कौतुक केले आहे. पाहा VIDEO

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) प्रेक्षक मनसोक्त आनंद घेताना पाहायला मिळत आहे. मराठी कलाकारांसोबत आता बॉलिवूड सेलिब्रिटी देखील बिग बॉस मराठी 5 च्या सदस्यांचे कौतुक करतान पाहायला मिळत आहेत.

'बिग बॉस मराठी' च्या घरात प्रत्येक दिवशी नवीन राडा पाहायला मिळतो. 'बिग बॉस मराठी' च्या प्रत्येक सदस्यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सध्या एका बॉलिवूड सेलिब्रिटीने वर्षा उसगांवकर यांचे कौतुक केलं आहे. या आठवड्यात वर्षा ताईने आपला जबरदस्त गेम दाखवला आहे. वयाने मोठ्या असून सुद्धा त्या नव्या पिढीसोबत त्यांच्याच एनर्जीने खेळताना दिसत आहेत. त्यांच्या या खेळावर बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिला तिच्या पुढच्या गेमसाठी जॅकी श्रॉफ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) त्यांचे भरभरून कौतुक करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ म्हणतात की, "एक नंबर... लय भारी... वर्षा... जास्त काही बोलणार नाही. बिग बॉसच्या घरात किंवा खऱ्या आयुष्यात तू भारीच आहेस. चल भेटू. Good Luck". अशा शब्दांत जॅकी श्रॉफ यांनी वर्षा ताईंचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. 'बिग बॉस मराठी' या आठवड्यात खूप गाजले. या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. तसेच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT