Govinda saamtv
मनोरंजन बातम्या

Govinda Birthday: हिरो नंबर वन, कमाईतही नंबर वन! बॉलिवूडपासून लांब; तरीही गोविंदा आहे 'इतक्या' कोटींचा मालक

सिनेसृष्टीत फारसा दिसत नसला तरी अभिनेता गोविंदा करोडोंच्या प्रॉपर्टीचा मालक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Govinda: आपल्या दमदार अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणून गोविंदाचे नाव घेतले जाते. 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेता अशी गोविंदाची खास ओळख आहे. कुली नं वन, हिरो नं वन असे एकापेक्षा एक धमाकेदार चित्रपटात गोविंदाने अभिनय केला, ज्यामधील त्याच्या अभिनयाची आजही चर्चा होत असते. बॉलिवूडच्या हिरो नं वनचा आज (21, डिसेंबर) वाढदिवस.

सध्या गोविंदा (Govinda) अभिनय जगतापासून लांब असला तरी अनेक कार्यक्रमांमध्ये तो हजेरी लावत असतो. सिनेसृष्टीत फारसा दिसत नसला तरी आजही तो करोडोंच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. वाढदिवसानिमित्त पाहूया त्याची एकूण संपत्ती.

अभिनेता गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 ला मुंबईमध्ये झाला.अभिनेता गोविंदाचे वडील अरुण कुमार अहूजा त्या काळातील लोकप्रिय कलाकार होते. त्यांनी 30-40 चित्रपटात कामही केले होते. कॉमर्समध्ये डिग्री पुर्ण केल्यानंतर गोविंदाने अनेक ठिकाणी नोकरीही केली होती. गोविंदाने इल्जाम चित्रपटातून हिंदी सिने जगतात पाऊल ठेवले होते. (Bollywood)

रिपोर्टनुसार अभिनेता गोविंदाची एकूण संपत्ती 140 कोटी आहे. गोविंदाने मुंबईमध्ये तीन आलिशान घरे खरेदी केली आहेत. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. त्याचबरोबर गोविंदाकडे मर्सिडिज बेंज सारख्या अनेक महागड्या गाड्यांचा ताफा आहे. गोविंदाची वार्षिक कमाई 16 ते 18 कोटी इतकी असून रिअल इस्टेट तसेच जमिनीच्या व्यवहारातून ही तो पैसे कमवतो.

त्याचबरोबर टिव्ही जाहिरातीसाठी तो 3- 4 कोटी इतके मानधन घेतो. तसेच एका चित्रपटासाठी तो 30 ते 40 लाख इतके मानधन घेतो. आपल्या कुटूंबासोबत तो अनेक रिअलिटी शोमध्ये दिसत असतो. ज्यासाठी गोविंदा तब्बल १ कोटी इतके मानधन घेतो.

दरम्यान 80-90 च्या दशकात अभिनेत्री रविना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत गोविंदाची जोडी प्रचंड हिट ठरली होती. कुली नं वन, हिरो नं वन, आंटी नं वन, राजा बाबू या गोविंदाच्या चित्रपटांनी कमाईचे नवनवीन रेकॉर्ड केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT