Aparshakti Khurana Saam Tv
मनोरंजन बातम्या

Berlin Film Premiere At MAMI Film Festival: प्रदर्शनापूर्वीच अपारशक्ती खुरानाच्या ‘बर्लिन’ची जोरदार चर्चा, मामि फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

Aparshakti Khurana Berlin Film: अपारशक्ती खुरानाच्या ‘बर्लिन’ चित्रपटाचा नुकताच मामि फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर पार पडला.

Chetan Bodke

Berlin Film Premiere At MAMI Film Festival

अपारशक्ती खुराना प्रमुख भूमिकेत असलेला ‘बर्लिन’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा नुकताच मामि फिल्म फेस्टिव्हलमध्ये (MAMI Film Festival) प्रीमियर पार पडला. सध्या त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून जोरदार कौतुक होत आहे. सोबतच त्याने साकारलेल्या भूमिकेचंही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. (Bollywood Film)

टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२३, लॉस एंजेलिस 2023 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मध्ये या चित्रपटाची आधी स्क्रिनिंग झालेली आहे. आता त्यानंतर मामि फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचं स्क्रिनिंग होणार आहे. प्रीमियरमध्ये अपारशक्तीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. कोणतीही भूमिका असो, ती अगदी लिलया पार पाडतो. ‘बर्लिन’ मधील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीसोबत खिळवून ठेवले होते. फक्त सेलिब्रिटींनीच नाही तर समीक्षकांनीही त्याचे कौतुक केले. (Award)

अतुल सबरवाल दिग्दर्शित आणि लिखित ‘बर्लिन’ चित्रपट अद्याप रिलीज झालेला नाही. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अपारशक्ती खुरानासोबत इश्वाक सिंग, राहुल बोस आणि कबीर बेदी हे कलाकार आहेत. ‘बर्लिन’ व्यतिरिक्त, अपारशक्ती ‘स्त्री २’ मध्येही दिसणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT