Amitabh Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan : विठ्ठलाची मूर्ती पाहून बिग बींनी जोडले हात, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

Amitabh Bachchan Video : गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहून अमिताभ बच्चन यांनी हात जोडले. नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या बॉलिवूडचे बच्चन कुटुंब चांगलेच चर्चेत आहे. सोशल मीडियावर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. यावर अलिकडेच बीग बींनी आपले मत मांडले होते. या सर्व गोष्टी म्हणजे फक्त अफवा असे त्यांनी सांगितले होते.

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जगभरात असंख्य दिवाने आहेत. त्याने त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अमिताभ बच्चन यांना भेटण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे अनेकजण दर रविवारी त्यांच्या मुंबईतील 'जलसा' बंगल्याबाहेर येतात. दर रविवारी अमिताभ बच्चनही आपल्या चाहत्यांना भेटायला बाहेर येतात. तसेच बीग बींसाठी खूप सुंदर गिफ्ट्स देखील घेऊन येतात. चाहते रविवारची वाट पाहत असतात.

अमिताभ बच्चन यांचा असाच एक रविवारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात अमिताभ बच्चन 'जलसा' बंगल्याबाहेर चाहत्यांच्या गर्दीत पाहायला मिळत आहेत. तेव्हा एका चाहत्याने हात उंचावून विठ्ठलाची मूर्ती अमिताभ बच्चन यांना दाखवली. ती मूर्ती खास त्या चाहत्याने बीग बींनसाठी आणली होती. ही मूर्ती पाहताच अमिताभ बच्चन यांनी हात जोडले आणि विठ्ठलाचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

अमिताभ बच्चन सर्व चाहत्यांना हात उंचावून आणि हात जोडून नमस्कार करत होते. असे करून ते सर्वांशी संवाद साधत होते. अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी , नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सध्या अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती 16' होस्ट करत आहेत. ते अलिकडेच 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात आपल्या दमदार भूमिकेत पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT