Akshay Kumar And Twinkle Khanna Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar on Marriage: अक्षयला लग्न म्हणजे 'मौत का कुवा' वाटतो, एका पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष...

सध्या अक्षयच्या एका सोशल मीडियावरील पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Chetan Bodke

Akshay Kumar: गेल्या काही दिवसांपूर्वीच ट्विंकल खन्नाचा वाढदिवस बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने वाढदिवस साजरा केला. नेहमीच अक्षय सोशल मीडियावर सक्रिय असून तो त्याच्या कुटुंबासोबत फोटो शेअर करत असतो. अक्षयचे बरेच फोटो पत्नी ट्विंकल आणि मुलगा आरव आणि मुलगी नितारा यांच्या सोबत अनेकदा शेअर करत असतो. सध्या अक्षयच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तो त्याच्या पोस्टमध्ये लग्नाला 'मौत का कुवा' असे म्हटले आहे.

अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला तब्बल २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. तो नेहमीच आपल्या परिवारासोबत काही गंमतीशीर व्हिडीओ शेअर करत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षय त्याच्या परिवारासोबत जुनी सर्कस पाहायला गेला होता.

यावेळी त्या मंडळींनी तिथे अनेक विविध स्टंट्स आणि काही कला सादर केली होती. नुकताच अक्षयने तेथील स्टंट्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती दुचाकी सुसाट चालवताना दिसत आहे. त्याच्या या पोस्टवरील कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले.

या व्हिडीओला अक्षयने कॅप्शन दिले की, " मी माझ्या कुटुंबासोबत काल जुनी सर्कस पाहायला गेलो होतो, तेव्हा माझ्या बायकोने मला हा कोणता स्टंट सुरू आहे असे विचारले. तेव्हा मी मनातल्या मनात म्हणालो, याला खरंतर लग्न असं म्हणायचं." त्याने त्या व्हिडीओला 'मौत का कुआ'चा hashtag ही दिला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असला तरी, व्हिडीओची सर्वत्र कमालीची चर्चा होत आहे.

नववर्षाच्या निमित्ताने का होईना अक्षयचे सर्व कुटुंब सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. अक्षयचे २०२२ मध्ये सर्वच चित्रपट सुपर फ्लॉप झाले असून २०२३ मध्ये कशी कमाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT