Akshay Kumar Becomes Good Looking Person In India  instagram @akshaykumar
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar In Trend: अक्षय कुमारच्या पदरात यश आणि अपयश एकत्र; ठरला पन्नशीतला सर्वात तरुण व्यक्ती

अक्षय कुमारचा 'गुड लूकिंग पर्सन इन इंडिया'च्या यादीत समावेश.

Pooja Dange

Akshay Kumar Becomes Good Looking Person In India: अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटाच्या अपयशामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळविण्यात फेल ठरले आहेत. अक्षय कुमार सध्या त्याच्या आणि नोराच्या एका डान्स व्हिडिओमुळे ट्रोल होत आहे. अशातच त्याला एक सन्मान देखील मिळाला आहे.

खिलाडी कुमार ५५ वर्षाचा आहे. अक्षयने वयाची पन्नाशी जरी पार केली असली त्याचा फिटनेस अनेक तरुणांना लाजवेल असा आहे. अजूनही अॅक्शन चित्रपटांमध्ये अक्षय उत्कृष्ट कामगिरी करतो. अशा या अभिनेत्याचा 'गुड लूकिंग पर्सन इन इंडिया'च्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

चित्रपट समीक्षक नितेश नवीन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, इंडिया टुडेच्या सर्वेक्षणानुसार #AkshayKumar हा पन्नाशीत असलेला भारतातील सर्वात गुड लूकिंग व्यक्ती ठरला आहे. तर या यादीत सलमान खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. चाळीशीत असलेला हृतिक रोशन तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाहरुख खान चौथ्या तर अमीर खान पाचव्या क्रमांकावर आहे.

नितेश नवीन यांनी या पोस्टसह अक्षय कुमारचा एक हॉट फोटो पोस्ट केला आहे. तसेच हृतिक रोशन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याने आश्चर्य देखील व्यक्त केले आहे.

अक्षय कुमारचा 'सेल्फी' हा चित्रपट २४ फेब्रुवारी, २०२३ला प्रदर्शित झाला आहे. अक्षयच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवता आले नाही. इमरान हाश्मी आणि नुसरत भरूचा असलेल्या या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. परंतु हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT