Abhishek Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan: लग्नाची कॅन्सरशी तुलना, अभिषेकने सांगितला 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा किस्सा

Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनचा 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शूजित सरकारच्या मित्राच्या जीवनावर आधारित आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्याच्या आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत. तर दुसरीकडे अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

'आय वॉन्ट टू टॉक' (I Want To Talk) या चित्रपटातून अभिषेक आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कॅन्सरने ग्रस्त असलेल्या शूजित सरकारच्या मित्राच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अभिषेकच्या भूमिकेचे नाव अर्जुन आहे. ज्याला जगण्यासाठी फक्त 100 दिवस मिळतात. अभिषेकने चित्रपटासाठी शूजित सरकारशी संवाद साधला तेव्हा त्यांनी एक किस्सा सांगितला. ज्यात शूजितच्या मित्राने लग्नाची तुलना कॅन्सरशी केली होती. हे ऐकून अभिषेकला खूप आश्चर्य वाटले.

एका मिडिया यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शूजित सरकार सांगतात की ज्या मित्राच्या जीवनावर 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट आधारित आहे तो एकदा मला म्हणाला होता की, "माझे लग्न कर्करोगामुळे झाले आहे. आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला तो सकारात्मकतेने पाहतो. "

पुढे अभिषेक म्हणाला की, "आम्ही चित्रपटाचा एक भाग लॉस एंजेलिसमध्ये शूट केला आहे. तेव्हा अर्जुन दा ने अशीच एक गोष्ट मला सांगितली होती. " तो मला म्हणाला, "हे सुखी वैवाहिक जीवन नसून ते लग्न आहे. " यापुढे अभिषेक म्हणाला, "मला वाटले की कर्करोगाबद्दल विचार करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे." आपल्या बोलण्याचे स्पष्टीकरण देत अर्जुन पुढे म्हणाला की, "लग्नाप्रमाणे केवळ मृत्यूच आपल्याला वेगळे करू शकतो. शेवटपर्यंत हार मानायची नाही. " शेवटी अभिषेक बच्चन यावर बोला की, याला आयुष्यात नकारात्मक राहायचे नाही. प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकता शोधतात."

सध्या सोशल मीडियावर निम्रत कौर आणि अभिषेक बच्चन यांच्या डेटिंगची चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT