Ira Khan And Nupur Shikhare Wedding Update Saam tv
मनोरंजन बातम्या

Ira Khan Wedding Update: मराठमोळ्या पद्धतीने होणार आमिर खानच्या लाडक्या लेकीचं लग्न, कधी आणि कुठं होणार आयराचा विवाहसोहळा?

Ira Khan And Nupur Shikhare Wedding: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेच अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाला अवघे काही दिवसच शिल्लक असून नुकतीच लग्नाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Chetan Bodke

Ira Khan And Nupur Shikhare Wedding Update

बॉलिवूडचा (Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेच अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरेच्या (Nupur Shikhare) लग्नाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. येत्या ३ जानेवारीला हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे. आयरा आणि नुपूरच्या प्री-वेडिंग फंक्शन्सना सुरूवात झाली आहे. लग्नाला अवघे काही दिवसच शिल्लक असून नुकतीच लग्नाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. (Bollywood)

‘न्यूज १८’ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, खान कुटुंबीय आणि शिखरे कुटुंबीय सध्या प्रचंड आनंदित आहेत. हे दोन्हीही कुटुंबीय नव्या वर्षाची सुरुवात खूपच आनंदी आणि धमाकेदार पद्धतीने करणार आहेत. इरा आणि नुपूरचे लग्न ३ जानेवारीला वांद्रे येथील आलिशान ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये होणार आहे. आणि नंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दोन रिसेप्शन पार्टी होणार आहेत. पहिली दिल्लीमध्ये आणि दुसरी जयपूरमध्ये होणार आहे. (Bollywood News)

रिपोर्टनुसार, आमिर त्याच्या मुलीच्या लग्नासाठी खूपच उत्सुक आहे. अमिर स्वत: बी-टाऊनमधील त्याच्या कलाकार मित्रांना लग्नाचं आमंत्रण देत आहे. अनेक सेलिब्रिटी न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी सुट्टीवर गेल्यामुळे ते लग्नाला उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे अनेक कलाकार जयपूरमधील रिसेप्शनला हजेरी लावतील. इतकंच नाही तर आयराचं लग्न पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने होणार आहे. (Social Media)

नुपूर व आयरा यांचे काही दिवसांपूर्वीच मराठमोळ्या पद्धतीने केळवण पार पडले, त्यांच्या केळवणादरम्यानचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. आयरा आणि नुपूर दोघेही एकमेकांना कोरोनाकाळापासून ओळखतात. नुपूर शिखरे पेशाने फिटनेस ट्रेनर आहे. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी इटलीमध्ये साखरपुडा केला होता. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

World Hepatitis Day: हिपॅटायटीस टाळण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा

Parliament Monsoon Session: 'ऑपरेशन सिंदूर' का थांबवलं? परत सुरू होणार का ऑपरेशन? संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलं उत्तर

Kalyan : बनावट फोटो लावून जमिनीचा डेव्हलपमेंट करार, ११ जणांवर गुन्हा दाखल; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT