Selfiee First Review  Instagram @akshaykumar
मनोरंजन बातम्या

Selfiee Movie Review: सिनेमाचा हिरो अक्षय कुमार पण भाव खाल्लाय इमरान हाश्मीने..!

'सेल्फी' चित्रपटातील अक्षय कुमारच्या नाहीतर इमरान हाश्मी भूमिकेचे होत आहे कौतुक.

Saam Tv

Selfiee Movie 1st Review: अक्षय कुमारच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अक्षयचे गेले अनेक चित्रपट पडद्यावर चांगली कामगिरी करू शकले नाहीत. अक्षय कुमारच्या चित्रपटाचा आशय नेहमीच वेगळा असतो. त्यामुळे चित्रपटप्रेमी आणि चाहते सेल्फी या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सेल्फीची चर्चा आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू आला आहे. चला जाणून घेऊया कसा आहे अक्षय आणि इमरान हाश्मीचा चित्रपट.

चित्रपट समीक्षक उमेर संधू यांनी अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांच्या सेल्फी चित्रपटाचे रिव्ह्यू शेअर केले आहे. सेल्फी या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू सेन्सॉर बोर्डाकडून आला आहे, असे त्यांनी रिव्ह्यूमध्ये लिहिले आहे.

उमैर यांनी म्हटले आहे की, चित्रपटाचे कथानक अगदी सोपे आहे. चित्रपटाच्या कथेची सुरुवात एका गैरसमजुतीने होते. त्यानंतर हा त्याचे रूपांतर अहंकारात होते. तुम्ही चित्रपटाशी सहज कनेक्ट होता. अक्षय कुमारने चित्रपटामध्ये चांगले काम केले आहे, पण इमरान हाश्मीने दमदार अभिनयाने साऱ्यांचे मन जिंकले आहे.

'सेल्फी' हा चित्रपट २४ फेब्रुवारीला म्हणजे आज चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत इमरान, नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'सेल्फी' हा पृथ्वीराज सुकुमार यांच्या सुपरहिट मल्याळम चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स'चा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 150 कोटींमध्ये बनला आहे. निर्मात्यांना आशा आहे की चित्रपट पहिल्या दिवशी 10 ते 15 कोटी रुपये कमवू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT