Bipasha Basu and Mika Singh controversy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bipasha Basu On Mika Singh: मिका सिंगवर बिपाशा बासूचा पलटवार; म्हणाली,'विषारी आणि नकारात्मक लोक...'

Bipasha Basu and Mika Singh controversy: गायक मिका सिंगने डेंजरस नावाची वेब सिरीज तयार केली. या मालिकेत बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर दिसले होते. बिपाशासोबत काम करण्याचे अनुभव सांगताना मिका सिंग तिला ट्रॉल केले होते.

Shruti Vilas Kadam

Bipasha Basu On Mika Singh: गायक मिका सिंगने एका मुलाखतीत बिपाशा बसू आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हरसोबत काम करण्याचे त्याचा अनुभव शेअर केले. त्याने सांगितले होते की बिपाशा सिंगने सेटवर खूप नाटक करायची. बिपाशामुळे मालिकेच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बराच विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले होते. २०२० मध्ये, बिपाशा बसूची मालिका डेंजरस प्रदर्शित झाली जी मिका सिंगने निर्मित केली होती. आता बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करून मिका सिंगला प्रतिउत्तर दिले आहे. बिपाशाने कोणाचेही नाव लिहिलेले नाही, पण लोकांचा असा विश्वास आहे की बिपाशाने ही पोस्ट मिका सिंगसाठी केली आहे.

बिपाशा बसूने मिकाला लक्ष्य केले?

बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिले "विषारी लोक अराजकता निर्माण करतात, इतरांकडे बोटे दाखवतात, इतरांवर आरोप करतात आणि जबाबदारी घेणे टाळतात." ही पोस्ट शेअर करताना बिपाशाने लिहिले "विषारीपणा आणि नकारात्मकतेपासून दूर राहा. देव सर्वांना आशीर्वाद देवो, दुर्गा दुर्गा!"

मिकाने बिपाशाबद्दल काय म्हटले होते

या पोस्टमध्ये बिपाशाने कोणाचेही नाव लिहिलेले नाही, परंतु लोकांचा असे म्हणणे आहे की बिपाशाने ही पोस्ट मिका सिंगसाठी केली आहे. मिका सिंगने त्याच्या मुलाखतीत सांगितले होते की त्याच्या मालिकेचे बजेट ४ कोटी होते, परंतु बिपाशामुळे चित्रपटाचे बजेट १४ कोटींपर्यंत वाढले होते. बिपाशासोबत काम करण्याचा मिकाचा अनुभव चांगला नव्हता.

मिकाने सांगितले होते की बिपाशाला चित्रपटात दुसऱ्या अभिनेत्रीसोबत कास्ट करण्यात आले होते पण बिपाशाने अचानक चित्रपटात अनेक अटी घातल्या. मिकाच्या मते, बिपाशाने अनेक सीन करण्यास नकार दिला. पोस्ट प्रॉडक्शन दरम्यान, बिपाशा आणि तिचा पती करण यांनी आरोग्याच्या कारणास्तव चित्रपटाचे प्रदर्शन अनेक वेळा पुढे ढकलले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळासाहेब एरंडे उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT