Vishal Nikam  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yed Lagla Premacha: 'बिग बॉस' फेम विशाल निकमचा रावडी अवतार, 'येड लागलं प्रेमाचं'चा प्रोमो पाहिला का?

Priya More

Yed Lagla Premacha Serial:

स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यानंतरा आता स्टार प्रवाहवर येड लागलं प्रेमाचं ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेच्या माध्यमातून 'बिग बॉस मराठी ३'चा विनर आणि अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) आणि अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून विशाल आणि पूजा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. नुकताच या मालिकेचा जबरदस्त प्रोमो समोर आला. जो पाहून दोघांचेही चाहते खूपच उत्सुक झाले आहेत.

स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagla Premacha Serial) ही नवी मालिका प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असणार आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपूरामध्ये या मालिकेची गोष्ट घडणार आहे. या मालिकेमध्ये विशाल निकमने रायाची तर पूजा बिरारीने मंजिरीची भूमिका साकारली आहे. दोन वेगवेगळ्या मतांचे आणि एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरी यांचा एकमेकांच्या प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये विशाल निकम आणि पूजा बिरारीसोबत अनेक दिग्गज कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. या मालिकेच्या माध्यमातून नीना कुलकर्णी या पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. नीना कुलकर्णी यांच्यासोबत अतिशा नाईक देखील या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत आहे. नेहमीप्रमाणे अतिशा नाईक आपल्याला खलनायिकेच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेचा प्रोमा शेअर करत कॅप्शनमध्ये 'ऐक ना जनाचं, ते ऐक ना मनाचं...', असं कॅप्शन दिले आहे.

पूजा बिरारीने स्टार प्रवाहवरील स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा या मालिकेमध्ये काम केले होते. तर विशाल निकम हा बिग बॉस मराठी ३ चा विनर आहे. त्यानंतर तो स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेमध्ये दिसला होता. आता हे दोघेही 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेमध्ये एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहेत.

विशालने सांगितले की, 'स्टार प्रवाह माझं कुटुंब आहे. या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होतोय याचा खूप आनंद आहे. मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके असं हे पात्र आहे. खऱ्या आयुष्यातही माझं आणि विठुरायाचं खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो. माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या मालिकेची गोष्ट देखिल पंढरपुरात घडते. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.'

पूजा बिरारीने सांगितले की, 'एका छोट्या ब्रेकनंतर मी देखील मंजिरी हे पात्र साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. मंजिरी या नावातच गोडवा आहे. हाच गोडवा या पात्रात देखिल आहे. विठुराया तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. शुटिंगच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच पंढरपुरात गेले. पण पहिल्यांदा गेलेय असं जाणवलं नाही. पंढरपुराने मला आपलसं केलं आहे असं मला वाटत होतं. पंढरपुरातल्या प्रत्येक गोष्टीत विठुरायाचा वास आहे. शुटिंगच्या निमित्ताने ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

SCROLL FOR NEXT