Manisha Rani Saam Tv
मनोरंजन बातम्या

'बिग बॉस' फेम Manisha Raniची आलिशान मर्सिडिज कार पाहिली का?, आकडा पाहून तुमचेही डोळे फिरतील

Manisha Rani New Car Video: 'इलक दिखला जा 11'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करत मनिषा राणीने या शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली. मनिषा राणीने काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्यानंतर आता तिने कोट्यवधी रुपयांची आलिशान कार खरेदी केली आहे.

Priya More

Manisha Rani Mercedes Car:

'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT 2) फेम आणि 'झलक दिखला जा 11'विनर मनिषा राणीला (Manisha Rani) सध्या कोणत्याही ओळखीची गरज नाही. मनिषा राणी या इंडस्ट्रीमध्ये सध्या प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे जी डान्स आणि फनी व्हिडीओसाठी ओळखली जाते. मनिषा राणी सध्या चांगलीच चर्चेत असते. कमी वयामध्ये तिने चांगलंच नाव कमावले आहे.

चुलबुली स्वभाव, मनमोहक बिहारी स्टाइल आणि आपल्या जबरदस्त डान्स स्टाइलमुळे मनिषा राणी सर्वांचे मन जिंकते. 'इलक दिखला जा 11'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करत मनिषा राणीने या शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली. मनिषा राणीने काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्यानंतर आता तिने कोट्यवधी रुपयांची आलिशान कार खरेदी केली आहे.

मनिषा राणीने नुकताच काळ्या रंगाची मर्सिडीज कार खरेदी केली. या कारची किंमत ऐकून आणि आकडा पाहून सर्वजण चकीत झाले आहेत. मनिषा राणीने तब्बल 36,00000 रुपयांची आलिशान कार खरेदी केली आहे. मनिषा राणीचा या कारमधून उतरतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मनिषा राणीवर सध्या तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मनिषा राणीने डिसेंबर २०२३ ला मर्सिडीज कार खरेदी केली होती. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मनिषा राणीने स्वत:लाच ही कार गिफ्ट केली. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. आपले स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मनिषा राणीने एकच जल्लोष करत या कारचे ग्रँड ओपनिंग केले होते. मनिषा राणीने काही दिवसांपूर्वी युट्यूब व्लॉगवर एक व्हिडीओ शेअर करत सांगितले होते की, बिहारमध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. प्रॉपर्टी खरेदी करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

दरम्यान, मनिषा राणी सलमान खानच्या 'बिग बॉस OTT 2' या शोमध्ये दिसली होती. घरात असताना ती अभिषेक मल्हान आणि एल्विश यादवसोबत खूप मस्ती करताना दिसली. मनिषाची अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांच्यासोबतची मैत्री खूप चर्चेत आहे. मनीषा 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये दुसरी उपविजेती ठरली होती. अभिषेक मल्हान हा पहिला उपविजेता ठरला. तर एल्विश यादवने विजेता म्हणून या शोची ट्रॉफी जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT