Bigg Boss OTT 3 Last Weekend Ka War Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3 Latest News : ‘अब मजा आएगा ना भिडू...’; ‘विकेंड का वार’मध्ये स्पर्धकांना मिळणार ४ मोठे धक्के, जाणून घ्या...

Bigg Boss OTT 3 Weekend Ka War : येत्या शुक्रवार आणि शनिवारी ‘विकेंड का वार’ मध्ये स्पर्धकांना चार मोठे धक्के मिळणार आहेत.

Chetan Bodke

अवघ्या काही दिवसांवरच ‘बिग बॉस ओटीटी ३’ चा ग्रँड फिनाले येऊन ठेपला आहे. अशातच या विकेंडला फक्त खेळाडूंनाच नाही तर प्रेक्षकांनाही मोठा धक्का मिळणार आहे. येत्या ‘विकेंड का वार’ मध्ये प्रेक्षकांसह स्पर्धकांना चार मोठे धक्के मिळणार आहेत. शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या ‘विकेंड का वार’मध्ये डबल एलिमिनेशन आणि फॅमिली वीकसह आणखी दोन मोठमोठे धक्के स्पर्धकांना मिळणार आहेत.

‘बिग बॉस ओटीटी ३’बद्दलचे महत्वाचे अपडेट देणार्‍या ‘बिग बॉस तक’ या पेजने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात ‘विकेंड का वार’मध्ये स्पर्धकांचे आई- वडील यांच्यासह जवळचे नातेवाईक स्पर्धकाला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात येणार आहेत. यावेळी अरमान मलिकच्या दोन्हीही पत्नी आणि त्यांचे मुलं ‘विकेंड का वार’मध्ये अरमान मलिकला भेटायला येणार आहेत.

यंदाच्या आठवड्यात लवकेश कटारिया, शिवानी कुमारी आणि विशाल पांडे नॉमिनेट झालेले आहेत. ‘बिग बॉस तक’ या पेजने दिलेल्या माहितीनुसार, शिवानी कुमारी हिला घरातले इतरत्र स्पर्धक नॉमिनेट करण्याची शक्यता आहे. ग्रँड फिनालेच्या आधीच्या दिवसांमध्ये शिवानी कुमारी घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप अधिकृ घोषणा झालेली नाही.

येत्या आठवड्यात, दोन आठवड्यात एलिमिनेशन होणार असून पहिलं एलिमिनेशन घरातल्यांच्या वोट्स आधारावर आणि दुसरं एलिमिनेशन प्रेक्षकांच्या वोट्सवर होणार आहे. त्यासोबतच या आठवड्यात मिडिया प्रतिनिधीही येणार आहेत. यावेळी त्यांच्या प्रश्नांना सर्व स्पर्धकांना उत्तर द्यावे लागणार आहेत. त्यासोबतच, मिडियासोबत संवाद साधल्यानंतर कोणकोणत्या स्पर्धकाच्या खेळात बदल होणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT