Bigg Boss OTT 3 Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3 च्या फिनालेची तारीख आली समोर, विजेत्याला मिळणार इतक्या लाखांचं बक्षिस

Bigg Boss OTT 3 Poster & Date of Finale: 'बिग बॉस ओटीटी ३'चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. नुकतीच ग्रँड फिनालेची तारीख जाहीर झाली आहे.

Chetan Bodke

'बिग बॉस ओटीटी ३'चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. Bigg Boss OTT 3 च्या ग्रँड फिनालेची तारीख जाहीर झाली आहे. वास्तविक, याआधी शोचा फिनाले प्रीमियरच्या ४० दिवसांनंतर म्हणजेच २८ जुलैला होणार, असे सांगितले जात होते. मीडिया रिपोर्टनुसार, Bigg Boss OTT 3 चा ग्रँड फिनाले २८ जुलैला होणार नसून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ग्रँड फिनाले होईल.

सोशल मीडियावर 'बिग बॉस ओटीटी ३'बद्दल अपडेट देणाऱ्या 'बिग बॉस तक' या सोशल मीडिया पेजवरून अनिल कपूरच्या शोला आणखीन १ आठवड्याची मुदतवाढ मिळाली आहे. म्हणजेच आता 'बिग बॉस OTT-3' चा ग्रँड फिनाले ४ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ आता स्पर्धकांकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहे.

'द सियासत डेली'च्या वृत्तानुसार, 'बिग बॉस ओटीटी २' प्रमाणे 'बिग बॉस ओटीटी ३'च्या विजेत्यालाही २५ लाख रुपयांची मोठी बक्षीस रक्कम मिळणार आहे. लाखो रुपयांचे रोख पारितोषिक, 'बिग बॉस ओटीटी ३'ची ट्रॉफी, विजेत्याला कार किंवा इतर भेटवस्तू देखील मिळू शकतात.

'बिग बॉस ओटीटी ३' २१ जूनपासून हा शो 'जिओ सिनेमा' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. पहिल्या दिवशी १७ स्पर्धकांनी 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री मारली. त्यातील १७ सदस्यांपैकी ५ सदस्य घराबाहेर पडले आहेत. तर आता १२ सदस्य शिल्लक आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी, वाईल्ड कार्ड सदस्य अदनान शेखने एन्ट्री मारली. सध्या घरामध्ये, १३ सदस्य आहेत. आता या १३ स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरतोय. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT