Elvish Yadav  Saam TV
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav: एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या, रेव्ह पार्टीत विषारी सापांच्या विषाचा वापर; FSL रिपोर्टमध्ये खुलासा

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav: मागच्या वर्षी एल्विशला विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करत पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामध्ये तो वाईटपद्धतीने अडकला होता. नोएडा पोलिसांनी एल्विशविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली होती.

Priya More

Bigg Boss OTT 2:

'बिग बॉस ओटीटी 2' चा (Bigg Boss OTT 2) विनर एल्विश यादवच्या (Elvish Yadeav) अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. एल्विश यादव नेहमीच या नाही तर त्या कारणांमुळे चर्चेत राहतो. मागच्या वर्षी एल्विशला विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करत पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामध्ये तो वाईटपद्धतीने अडकला होता. नोएडा पोलिसांनी एल्विशविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली होती. याप्रकरणात त्याला जामीन मिळाला पण इतर ५ जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी नोएडा पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली होती. आता या प्रकरणात एफएसएलने (FSL) तपासाबात मोठा खुलासा केला आहे.

नोएडा पोलिसांनी सर्पमित्रांच्या ताब्यातून जप्त केलेले सापांचे विष एफएसएलच्या लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आता आला आहे. एफएसएलने या तपासात मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार कोब्रा केट प्रजातीच्या सापांचे विष सापडले आहे. आता एफएसएलच्या या अहवालानंतर एल्विश यादवच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आताच एल्विश यादव चर्चेत आला होता. त्याने जयपूरमधील हॉटेलमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

एल्विश यादवचे हे प्रकरण गेल्या वर्षीचे आहे. एनजीओ पीएफए अर्थात मेनका गांधींची संस्था पीपल फॉर अॅनिमल्सचे प्राणी कल्याण अधिकारी गौरव गुप्ता यांनी एल्विश यादवविरोधात नोएडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. एफआयआरमध्ये असे लिहिले होते की, 'एल्विशला दिल्ली एनसीआरमधील फार्म हाऊसमध्ये जिवंत सापांसह व्हिडिओ शूट केले गेले. हे साप आणि त्यांच्या विषाचा वापर रेव्ह पार्त्यांमध्ये बेकायदेशीरपणे केला जातो.

रेव्ह पार्त्यांमध्ये परदेशी तरुणींचा सहभागही उघडकीस आला. या पार्ट्यांमध्ये सापाचे विष आणि इतर अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी राहुल यादवची एक ऑडिओ क्लिप समोर आली होती ज्यामध्ये त्याने पीएफए सदस्याला सांगितले होते की, त्याने एल्विशच्या पार्टीला ड्रग्स पोहोचवले होते. पोलिसांना राहुलकडून २० मिली विष आढळून आले होते.

याप्रकरणानंतर एल्विश यादवे सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपण निर्दोश असल्याचे सांगितले होते. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला होता की, 'मी सकाळी उठलो. माझ्या विरोधात कोणत्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत हे मी पाहिले. एल्विश यादवला अटक झाली, एल्विश यादव ड्रग्जसह पकडला गेला...अशा बातम्या येत आहेत. या सगळ्या गोष्टी माझ्याविरोधात पसरवल्या जात आहेत. माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. सर्व खोटे आहेत. त्यात १ टक्काही सत्य नाही.'

एल्विशने पुढे सांगितले होते की, 'मी यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. मी यूपी पोलिस, संपूर्ण प्रशासन, माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करेन की या गोष्टीत माझा एक टक्काही सहभाग आढळला तर मी सर्व जबाबदारी घेण्यास तयार आहे.' यावेळी एल्विशने मीडियाला देखील विनंती केली आहे की, 'जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत अशा बातम्या प्रसिद्ध करू नका. माझे नाव बदनाम करू नका. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. दूर दूरपर्यंत १०० मैलांपर्यंत माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. हे आरोप सिद्ध झाले तर मी जबाबदारी घ्यायला तयार आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

Chhatrapati Sambhajinagar: रेडीको एनव्ही कंपनीमधील बॉयलरचा स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, सीसीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू

IND vs AUS: लय अवघड हाय गड्या.. दोनदा बॅटिंगला येऊनही विराटला अवघ्या इतक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT