Jiya Shankar Bigg Boss Captain Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 : तू सक्षम नाहीस... जिया शंकर विरोधात बिग बॉसच्या घरातील स्पर्धक एकवटले

BB OTT 2 Update : बिग बॉसच्या घरातील स्पर्धक आनंदी नसून संतापलेले दिसत आहेत.

Pooja Dange

Bigg Boss Contestant Against Jiya Shankar : बिग बॉस ओटीटी सीजन २ सुरु होऊन २० दिवस झाले आहेत. या वीस दिवसात बिग बॉसच्या घरामध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरात काही ऐतिहासिक घटना देखील घडल्या. अलीकडेच आकांक्षा पुरी बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाली आहे. बिग बॉसच्या घरात काही लोकांची मैत्री तुटलीय आहे. तर काही शत्रू मित्र होताना दिसत आहेत.

या शोमध्ये जिया शंकर नवीन कॅप्टन झाली आहे. मात्र, जिया कॅप्टन झाल्यामुळे बिग बॉसच्या घरातील स्पर्धक आनंदी नसून संतापलेले दिसत आहेत. कॅप्टन झालेल्या जियावर बिग बॉसच्या घरातील स्पर्धक प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यामुळे जियाचे कर्णधारपद धोक्यात आले आहे.

अविनाश सचदेव यांनी जियाकडे कर्णधारपद सोपवले होते आणि ती कॅप्टन होताच जियाने सर्वप्रथम स्टार स्पर्धक पूजा भटला नॉमिनेट केले. जियाला अद्याप कॅप्टन्सी मिळालेली नाही जियाला त्यासाठी काही मतांची गरज आहे. पण जियाला पाठिंबा देणाऱ्यांपेक्षा जियाला विरोध करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

जिओ सिनेमाच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये आज रात्री स्ट्रीम होणार्‍या एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये, बिग बॉस ओटीटी 2 च्या आगामी भागात, घरातील सदस्य जियाच्या विरोधात मतदान करताना दिसणार आहेत. (Latest Entertainment News)

यावरून स्पर्धकांमध्ये वाद-विवाद होताना देखील दिसत आहेत. जियाच्या कॅप्टन्सीच्या विरोधात मतदान करताना एका स्पर्धकाने सांगितले की, जिया निर्णय घेण्यास मागे-पुढे करते. दुसरीकडे पूजा भटही जियाविरोधात म्हणते की कॅप्टन आणि नेता बनणे ही मोठी जबाबदारी आहे. लोक म्हातारे होतात पण मोठे होऊ शकत नाहीत.

बिग बॉसचं घरातील बहुतेक सदस्य जियाच्या विरोधात मतदान करत असताना जिया तिचे कर्णधारपद वाचवू शकतील का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

बिग बॉस ओटीटी 2 हळूहळू रंगात आला आहे. स्पर्धक त्यांच्या जुन्या नात्यांचा उलघडा करत आहेत आणि स्पर्धकांचे खरे व्यक्तिमत्व समोर येत आहे. कॅप्टनसीच्या टास्कमध्ये जियाला तीन तास खुर्चीवर बसावे लागले आणि या टास्कमध्ये जियाला खुर्चीवरून हटवण्याचा निर्धार कुटुंबीयांनी केला.

आजच्या एपिसोड्सचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, जियासोबत काय होणार याबद्दल प्रेक्षक संभ्रमात आहेत. मागच्या वेळेप्रमाणेच यावेळीही सुपरस्टार सलमान खान बिग बॉस ओटीटी 2 होस्ट करत आहे आणि या शोमध्ये दररोज नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT