Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Nikki Tamboli: अरबाज गेल्यानंतर निक्कीच्या आयुष्यात मोठा दुष्काळ, रडत म्हणाली...

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसच्या घरात निक्की पुन्हा रडली आहे. नुकताच नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीमुळे निक्की सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरातील निक्की तिच्या दमदार खेळीमुळे ओळखली जाते. बिग बॉसच्या आठव्या आठवड्यात मत कमी मिळाल्याने अरबाज घरातून बाहेर पडला. बिग बॉस गेल्यानंतर घरातील स्पर्धकासह चाहते नाराज झाल्याचे दिसले.

बिग बॉस मराठीच्या घरात निक्की आणि अरबाजची मैत्री घट्ट होती. दोघेही कायम एकमेकासोबत दिसत होते. कधी प्रेम तर कधी भांडणं अशी निक्की आणि अरबाजची खेळी पाहायला मिळाली. अशातच आठव्या आठवड्यात अरबाज घरातून जाणार असल्याच समजताच निक्की ढसाढसा रडताना दिसली. निक्की अरबाजला तू जाऊ नको ना... आता माझ्याशी कोण गप्पा मारेल अश्या भावना व्यक्त करताना दिसली.

नुकताच बिग बॉसच्या एका नवीन प्रोमोमध्ये निक्की पुन्हा रडताना दिसत आहे. निक्की म्हणतेय की, "बिग बॉस आता माझ्या आयुष्यात मोठा दुष्काळ आलाय..." सोशल मीडियावर कलर्स मराठीच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. येत्या काही दिवसांतच बिग बॉस मराठीचा शो संपणार आहे. अलिकडेच बिग बॉस मराठीने अधिकृतपणे ग्रँड फिनालेची तारीख जाहीर केली. बिग बॉस मराठीच्या घरात आता कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT