Suraj Chavan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan: थोडीशी हसली, थोडीशी लाजली; सूरजला पाहून गौतमीचा आनंद गगनात मावेना, Video 'गुलिगत' व्हायरल

Suraj Chavan And Gautami Patil Video: सूरज चव्हाणसोबतच्या भेटीचा व्हिडीओ गौतमी पाटीलने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला गुलिगत सूरज चव्हाण सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस मराठीचा विनर झाल्यानंतर सूरज रोज लोकप्रिय व्यक्तीची भेट घेताना दिसतोय. नुकतंच सूरज चव्हाण आणि प्रसिद्ध नृत्यागंणा गौतमी पाटीलची भेट झाली आहे. सूरज चव्हाणसोबतच्या भेटीचा व्हिडीओ गौतमी पाटीलने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय.

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर सूरजच्या भेटीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सूरजला भेटल्यानंतर गौतमीला आनंद झालेला दिसतो आहे. गौतमी पाटील आणि सूरज मेकअप रूमध्ये एकमेकांशी छान गप्पा मारताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करत गौतमीने 'बिग बॉस विजेता सूरज चव्हाण' असं कॅप्शन दिलं आहे. गौतमीच्या व्हिडीओवर लाखो लाईक्स आणि व्ह्यूज आले आहेत.

सूरज चव्हाण हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय झाला. सूरजचे मनोरंजनात्मक रिल्स आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. सूरज चव्हाणचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. नृत्यांगणा म्हणून गौतमी पाटीलची क्रेझ कायम आहे. मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना गौतमी भेट देते. गौतमी पाटीलचे तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केलेला या दोघांचा प्रवास आता सिनेसृष्टीकडे वळताना दिसतो आहे. अलिकडेच बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाण राजाराणी या चित्रपटात दिसणार आहे. तर प्रसिद्ध नृत्यागंणा अशी ओळख असलेली गौतमी पाटील ही लाईक अॅन्ड सबस्क्राईब या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT