Yogita Chavan Cried And She Wants Quit Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : योगिता चव्हाणने रडतच रितेश देशमुखसमोर व्यक्त केली बाहेर जाण्याची इच्छा, नेमकं काय घडलं ?

Yogita Chavan Cried And She Wants Quit Show : ‘बिग बॉस मराठी’च्या 'भाऊचा धक्का'वर रितेशने योगिता चव्हाणचे कौतुक केले. यावेळी अभिनेत्रीचं कौतुक करताच तिला अश्रू अनावर झाले आहे.

Chetan Bodke

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. नुकताच दुसरा 'भाऊचा धक्का' पार पडला. यावेळी रितेश देशमुखने सर्वच स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे.

पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळीची कानउघडणी केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात रितेशने जान्हवी किल्लेकरची कानउघडणी केली आहे. यावेळी रितेशने काही स्पर्धकांचे कौतुकही केले. सूरज चव्हाण आणि योगिता चव्हाणचे कौतुक केले.

यावेळी अभिनेत्रीचं कौतुक करताच तिला अश्रू अनावर झाले आहे. यावेळी तिने रितेशच्या समोर मनातली एक इच्छा बोलून दाखवली आहे. तिच्या ह्या इच्छेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

शनिवारी झालेल्या 'भाऊचा धक्का'वर योगिताने रितेशच्या समोर घरातून बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त झाली आहे. योगिता म्हणाली की, "मी संपूर्ण टीमची माफी मागतेय. मला माहित नाही, मी कशी खेळतेय. पण मला बिग बॉसच्या घरात नाही राहायचंय. मला अनेक जणं म्हणाले, तू इथे कशाला आलीस. माझी ही खूप मोठी चूक झालीये, हे मी मान्य करते. खरंतर मी इथे यायलाच नको होतं. नकार सध्या मला सहन होत नाहीये. मी इथे नाही राहू शकत. मला बाहेर प्लीज बाहेर जायचं आहे. मला घरात राहायचं नाही. मला हा खेळ सोडायचा आहे." असं म्हणून योगिता रडू लागली.

अभिनेत्रीला रडू कोसळल्यानंतर रितेश तिला समजवायला लागला, रितेश योगिताला म्हणाला की, "बिग बॉसच्या घरात कोणी राहायचं आणि कोणी नाही राहायचं, हे मी नाही ठरवत तर जनता ठरवते. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. कायम अशाच खेळत राहा तुम्ही. आता तरी तुम्ही असं हे घर सोडून बाहेर जाऊ शकत नाहीत." यावेळी अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांकडून घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठिशी आहोत, असं म्हणत तिला धीर दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT