Jahnavi Killekar And Arya Jadhav See Fighting Video Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 Promo: ‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडा, जान्हवीने आर्याच्या थेट कानाखालीच मारली; पाहा प्रोमो

Jahnavi Killekar And Arya Jadhav Watch Fighting Viral Video: ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सुरू आहे. घरात सहाव्या दिवशी पुन्हा एकदा स्पर्धकांमध्ये शाब्दिक वाद रंगला. त्या शा‍ब्दिक बाचाबाचीचे रुपांतर हाणामारी झाल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi Viral Video: ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. अल्पावधीतच या सीझनचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक होत आहे. जेमतेम काही दिवसांतच शोमध्ये स्पर्धकांमध्ये कडाक्याचे भांडण होताना दिसत आहे. घरात सहाव्या दिवशी पुन्हा एकदा स्पर्धकांमध्ये शाब्दिक वाद रंगला. त्या शा‍ब्दिक बाचाबाचीचे रुपांतर हाणामारी झाल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

नुकतंच कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर सहाव्या दिवसाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये, जान्हवी किल्लेकर आणि रॅपर आर्या जाधव यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या धमाकेदार प्रोमोमध्ये जान्हवी आणि आर्या एकमेकींसोबत नडताना दिसून येत आहे. जान्हवी-आर्यामध्ये धक्काबुक्की झालेली देखील पाहायला मिळत आहे.

दरम्यान जान्हवी म्हणते, "नॉमिनेशन कार्यात आर्या किती फडफड करत होती." त्यावर आर्या म्हणते, "माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका." तर जान्हवी आर्याला बोलते, "तु किती दिवस 'बिग बॉस मराठी'च्या घरात राहतेस ना तेच मी बघते." त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. आर्या आणि जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

आता या वादानंतर बिग बॉस कोणावर कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या शनिवार- रविवारी बिग बॉसच्या घरात चावडी पार पडेल. विकेंडच्या पहिल्याच चावडीवर रितेश देशमुख कोणाची शाळा घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अंकिता प्रभु वालावलकर, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण असे १६ स्पर्धक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT