Purushottam Patil On Who Is Bigg Boss Marathi 5 Winner Saam Tv
मनोरंजन बातम्या

अभिजीत सावंत की अंकिता वालावलकर, पुरूषोत्तम पाटीलने सांगितलं कोण जिंकणार Bigg Boss Marathi 5 ट्रॉफी ?

Purushottam Dada Patil News : पुरूषोत्तम दादा पाटील बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर व्हिडिओ शेअर करत त्यांनी बिग बॉसच्या विजेत्याबद्दल भाकित केलं आहे.

Chetan Bodke

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमधील पहिल्याच विकेंडला अर्थात पहिल्याच ‘भाऊचा धक्का’वर पहिलं एलिमिनेशन पार पडलं. यामध्ये किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर गेले आहेत. पुरूषोत्तम दादा पाटील बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी बिग बॉसच्या घरातील प्रवासाबद्दल आणि टॉप ३ स्पर्धकांबद्दल आपलं मत मांडलं आहे.

त्यांना व्हिडिओमध्ये, बिग बॉसच्या घरातील प्रवासाबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले की, "माझा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील अनुभव खूप छान होता. हा अनुभव मी माझ्या शब्दातूनही सांगू शकत नाही, इतका छान होता. मी पहिलाच एलिमिनेट होईल, असं मला केव्हाच वाटलं नव्हतं. हे माझ्या विचारसरणीपेक्षाही खूप वेगळे आहे. मी घरात व्यवस्थित वागूनही माझं एलिमिनेशन झालं, त्यामुळे मी सध्या तरी त्याच विचारात आहे."

अभिजीत सावंत, धनंजय पोवार उर्फ डीपी दादा आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हे स्पर्धक पुरूषोत्तम पाटील यांना बिग बॉसच्या घरातील टॉप ३ स्पर्धक वाटतात. तर गायक अभिजित सावंतला विजेता म्हणून पाहतात. तर त्यासोबतच अन्य स्पर्धकांबद्दलही पुरूषोत्तम पाटील ह्यांनी आपले मत मांडले. पुरुषोत्तम दादा पाटील हे मठाधिपती असून ते आळंदीतील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत. त्यांचा सोशल मीडियावर फार मोठा फॅन्सक्लब आहे.

पहिल्याच आठवड्यात बिग बॉस स्पर्धकांनी वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि पुरुषोत्तम दादा पाटील ह्यांना नॉमिनेट केले होते. पुरूषोत्तम पाटील आणि धनंजय पोवार हे दोघंही २ बॉटम सदस्य होते. यापैकी पहिल्याच आठड्यात पुरुषोत्तम दादा पाटील यांना घराबाहेर जावं लागलं आहे. त्यांच्या जाण्याने अनेक बिग बॉस स्पर्धक भावूक झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT