Bigg Boss Marathi 5 Latest Episode  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : भावनांच्या या खेळात सगळेच स्पर्धक झाले भावना शून्य, 'बिग बॉस' कोणती ॲक्शन घेणार?

Bigg Boss Marathi 5 Latest Episode : कालच्या एपिसोडमध्ये, घरात दोन चिमुकल्याचे आगमन झाले. स्पर्धक त्या बाळाची काळजी घेतानाही दिसत आहे. पण असं असलं तरीही आजच्या एपिसोडमध्ये, स्पर्धक भावना शून्य खेळाताना दिसत आहे.

Chetan Bodke

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील सध्या स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये आपआपसात वाद पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात नुकताच 'भाऊचा धक्का' पार पडला. यावेळी रितेशने भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांना घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक येणार आहे, असं सांगितलं होतं. कालच्या एपिसोडमध्ये, घरात दोन चिमुकल्याचे आगमन झाले. स्पर्धक त्या बाळाची काळजी घेतानाही दिसत आहे. पण असं असलं तरीही आजच्या एपिसोडमध्ये, स्पर्धक भावना शून्य खेळाताना दिसत आहे.

'बिग बॉस'च्या घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांनी सदस्यांना निरागस सुखासह टास्कचं दु:खंदेखील दिलंय. घरातील काही सदस्य बाळाची सर्वोत्तम काळजी घेताना दिसून आले. पण आजच्या भागात भावनांच्या या खेळात सदस्य भावशून्य झालेले दिसून येणार आहेत. त्यामुळे आता 'बिग बॉस' काय रिॲक्शन घेणार हे पाहावे लागेल. सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये, सदस्य एकमेकांसोबत चांगलेच जुंपले आहेत. सर्वच स्पर्धक खेळ भावाना शून्य खेळल्यामुळे काय ॲक्शन घेणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रोमोमध्ये, 'बिग बॉस' म्हणत आहेत, "हा खेळ मानवी भावनांचा आहे. दोन्ही टीम भावनाशून्य होऊन खेळलात. त्यामुळे मी देखील आता भावना शून्य होऊन ॲक्शन घेणार आहे..." घरातील सदस्य भावनाशून्य खेळल्याने बिग बॉस सदस्यांना काय शिक्षा देणार हे पाहावे लागेल. दरम्यान, गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात दुसरं एलिमिनेशन राऊंड पार पडलं नव्हतं. दुसऱ्या आठवड्यात एलिमिनेट झालेले सर्व स्पर्धक तिसऱ्या आठवड्यातही एलिमिनेट म्हणूनच राहणार आहे. आता तिसऱ्या आठवड्यात घराच्या बाहेर कोण जाणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी कारगिल दिन साजरा केला पाहिजे

Garlic Oil : हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी लसूण तेल ठरते फायदेशीर

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

SCROLL FOR NEXT