Bigg Boss Marathi 5 In First Captain Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : पहिल्या कॅप्टन्सीसाठी अरबाज आणि अभिजीतमध्ये चांगलीच जुंपली, नवा कॅप्टन कोण होणार ?

Bigg Boss Marathi 5 In First Captain : दुसऱ्या आठवड्यामध्ये बिग बॉसने स्पर्धकांना पहिल्यांदाच कॅप्टन्सीसाठी टास्क दिलेला आहे. या टास्कसाठी घरातल्या स्पर्धकांमध्ये चांगलीच जोरदार जुंपलेली पाहायला मिळत आहे.

Chetan Bodke

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये बिग बॉसने स्पर्धकांना पहिल्यांदाच कॅप्टन्सीसाठी टास्क दिलेला आहे. या टास्कसाठी घरातल्या स्पर्धकांमध्ये चांगलीच जोरदार जुंपलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकजण घरामध्ये कॅप्टन बनण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. घरामध्ये वाढलेल्या स्पर्धेमुळे प्रत्येकजण आपला वैयक्तिक खेळ सुधारताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर आठव्या दिवसाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धकांमध्येच आपआपसात कॅप्टन्सीसाठी जोरदार भांडण जुंपल्याचे दिसत आहे.

या आठवड्यामध्ये स्पर्धकांना पहिला कॅप्टन मिळणार आहे. त्या कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धकांमध्ये आपआपसात जुंपलेली आजच्या आठवड्यात मिळेल. यावेळी कॅप्टन बनण्यासाठी स्पर्धकांसाठी एक टास्क आयोजित करण्यात आला होता. 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' असं ह्या टास्कचं नाव आहे. प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य कॅप्टन होण्यासाठी टास्कमध्ये धडपड करताना दिसून येत आहेत. बुलेट ट्रेनमध्ये एका सीटसाठी स्पर्धक एकमेकांना धक्काबुक्की करताना देखील दिसत आहे. घराला या आठवड्यामध्ये पहिला कॅप्टन मिळणार आहे. त्यामुळे नवा कॅप्टन कोण होणार ? हे चाहत्यांना आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

कालच्या एपिसोडमध्ये, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, वैभव चव्हाण यांचं आणि पंढरीनाथ कांबळे, अभिजीत सावंत यांच्यामध्ये मध्यरात्री चांगलाच वाद पाहायला मिळाला. अरबाज पटेलला अभिजीत सावंतची खिल्ली उडवणं चांगलंच महागात पडले. यामुळे दोघांमध्येही चांगलीच हमरी- तुमरी रंगली. यावेळी प्रत्येक स्पर्धक आपण पहिल्या आठवड्यामध्ये कशापद्धतीने खेळलो, याबद्दल चर्चा करताना दिसले. आजच्या एपिसोडमध्ये, 'बिग बॉस'च्या घराला पहिला कॅप्टन मिळणार आहे. त्यामुळे पहिला कॅप्टन होणार ? याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कॅप्टन्सीबद्दल आजच्या एपिसोडमध्ये सर्व बाब उलगडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT