Bigg Boss Marathi  canva
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: ढगाला लागली कळं... 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य आज भिजणार पावसात

Bigg Boss Marathi New Promo: बिग बॉसच्या घरात आपण रोज हंगामा, रडारड आणि त्यांचे निरनिराळे टास्क बघत असतो. मात्र या भागात त्यांना पावसाचा आनंद लूटताना नक्की बघा. त्यात पॅडी दादाने घरातल्यांसोबत मनातल्या भावना व्यक्त करत माहोल बनवला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रत्येक सदस्य नेहमीच आपल्या स्टाईलने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. बिग बॉसच्या ४१ व्या भागात आता कॅप्टनपदी सूरज चव्हाणची निवड झाली आहे. सूरजच्या झापुक झुपुक स्टाईलने सर्वांचं काळीज जिंकलंय. यात त्याचे फॅन्स खूप खूश झाले. आता आजच्या भागात घरातले सदस्य पावसात भिजताना दिसणार आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य गार्डन एरियामध्ये जमले आहेत. तिथेच बिग बॉसचा आदेश येतो की, "आज सर्वांना पावसात भिजता येईल याचीव व्यवस्था केली आहे".

त्यानंतर घरातील सगळेच सदस्य 'ढगाला लागली कळं' या गाण्यावर रेन डान्स करताना दिसत आहेत. सर्वच सदस्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे. यानंतर प्रत्येकजण आपापल्या आठवणीत रमताना दिसले.

पंढरी शेवटचं पावसात कधी भिजलात? बिग बॉसचा पॅडी दादाला सवाल

बिग बॉसच्या ४२ च्या भागात पॅडी दादांना थेट बिग बॉसने प्रश्न विचारत त्यांचं मनोरंजन केलं. "पॅडी दादा तूम्ही शेवटचं कधी भिजला होतात?" असा सवाल बिग बॉसने केला. त्यावर उत्तर देत पॅडी म्हणतो,"खूप वर्ष झाली आहेत त्याला".बिग बॉस पूढे पॅडी दादाला व.पू. काळे यांच एक प्रसिद्ध वाक्य एकवतात ते म्हणजे,"पाऊस अनेक ठिकाणी एकाचवेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं". तसचं पावसावर चार्ली चॅप्लिन म्हणतात की,"मला पावसात भिजायला आवडतं. कारण तेव्हा माझे अश्रू दिसत नाहीत". त्यानंतर बिग बॉस पुढे पावसात भिजता येण्याची व्यवस्था केली असल्याचं सदस्यांना सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT