Riteish Deshmukh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : बिग बॉसमधून रितेश देशमुखची एक्झिट? ग्रँड फिनाले कोण करणार होस्ट? चर्चांना उधाण

Bigg Boss Marathi Riteish Deshmukh: बिग बॉसच्या घरात रितेश देशमुखने भाऊचा धक्का न घेतल्याने चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता शेवटच्या टप्पात आहे. बिग बॉसला मराठीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती आहे. बिग बॉस मराठीने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात फ्रीझ अॅन्ड रिलीज टास्क पार पडला. यामध्ये स्पर्धकांच्या घरातील मंडळीनी बिग बॉसच्या घराला भेट दिली. कलाकार मंडळी देखील बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अशातच बिग बॉसच्या घरात रितेश देशमुखने भाऊचा धक्का न घेतल्याने चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

सध्या बिग बॉस मराठीचा दहावा आठवडा सुरू आहे. पहिल्या आठवड्यापासून मनोरंजनविश्वात बिग बॉस मराठी चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात दर शनिवारी- रविवारी भाऊचा धक्का कार्यक्रम असतो. भाऊचा धक्का या कार्यक्रमात बिग बॉस होस्ट रितेश देशमुख स्पर्धकांची शाळा घेतात. मात्र मागील दोन आठवड्यांपासून भाऊचा धक्का हा कार्यक्रम होत नाही. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचा धक्का हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये निलेश साबळेसह पत्रकार मंडळी उपस्थित होती.

प्रत्येक आठवड्याप्रमाणे दर शनिवारी-रविवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सदस्यांना काय बोलणार याची प्रेक्षकांना आतुरता असते. मात्र या आठवड्यात देखील बिग बॉस कडून भाऊचा धक्का होणार नाही अशी घोषणा आली. दरम्यान, भाऊच्या धक्क्याऐवजी या आठवड्यात घरात अभिजीत बिचुकले, अनिल थत्ते, शरद उपाध्ये, राखी सावंत यांनी एन्ट्री घेतली आहे. बिग बॉस मराठी सध्या शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT