Bigg Boss Marathi Arbaz Patel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Arbaz Patel: "तू थोडी देर ठहर जा..." अरबाज घराबाहेर जाताच निक्की इमोशनल, ढसा ढसा रडली म्हणाली, आता मी कोणाशी...

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये आठव्या आठवड्यात अरबाज पटेलने एक्झिट घेतली आहे. घरात नॉमिनेट असलेल्या सदस्यांची वोटिंग कमी मिळाल्याने अरबाजला घराचा निरोप घ्यावा लागला आहे. अरबाजन घराबाहेर गेल्याने सर्वच स्पर्धकांना धक्का बसला आहे.

बिग बॉस मराठीचा आठवा आठवड्याचा कॅप्टन अरबाज पटेल होता. नुकतंच रविवारच्या कार्यक्रममध्ये एलिमेशन टास्क पाडला. यानुसार आठव्या आठवड्यात अरबाज एलिमिनेट झाल्याने निक्की निराश झाली आहे.सोशल मीडियावर अरबाजने एक पोस्ट शेअर केली आहे.

इमोशनल पोस्ट शेअर करत अरबाजने सर्वांनाच धक्का दिला आहे. बिग बॉसच्या घरात बिग बॉस या आठवड्यात घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचे नाव आहे अरबाज पटेल असे जाहीर करताच निक्कीला धक्का बसतो. निक्की ढसाढसा रडू लागते. तू थोडी देर ठहर जा... हे इमोशनल गाणं सुरू आहे. दरम्यान निक्की "आता मी काय करू, कोणाशी बोलू..., तू नको ना जाऊ प्लिज" अश्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाजची खेळी चांगली सुरू होती. पहिल्या आठवड्यापासून या दोघांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कधी भांडण तर कधी प्रेम एकमेकांशी चांगली बॉन्डिंग झाल्यानंतर आठव्या आठवड्यात अरबाज एलिमेट झाल्याचे बिग बॉसने जाहीर करताच निक्की भावूक झालेली पाहायला मिळाली. सोशल मिडियावर अरबाजने शेअर केलेल्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Richest Marathi Actress: मराठी चित्रपटातल्या श्रीमंत सिनेतारका; सर्वाधिक मालमत्ता कोणाची?

Ladki Bahin Yojana : सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? महत्वाची अपटेड समोर

Maharashtra News Live Updates: - इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीमुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक ठप्प

Bharatshet Gogawale: अखेर भरत गोगावले अध्यक्ष बनले एसटीचे अध्यक्ष, 2 दिवसांच्या नाराजीनंतर स्वीकारला पदभार

Rajgad Fort : इतिहासाची उजळणी करायचीय? फक्त 'या' ठिकाणाला द्या भेट

SCROLL FOR NEXT