Friendship Day In Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखच्या 'भाऊच्या धक्क्या'वर सेलिब्रेट होणार 'फ्रेंडशिप डे', जुळणार नव्या मैत्रीची नवीन समीकरणं

Chetan Bodke

लोकप्रिय मराठी कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५'ची सुरुवात धडाकेबाज झाली आहे. राडा आणि हमरी- तुमरीने सुरूवात झालेल्या या शोमध्ये पहिल्याच आठवड्यात घरात मोठे राडे झाले. पहिल्याच आठवड्यात निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि आर्या जाधव यांच्यात टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी झालेल्या 'भाऊचा धक्का' नंतर आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात 'फ्रेंडशिप डे' सेलिब्रेट केला जाणार आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' सेलिब्रेट केला जातो. यावर्षी ४ ऑगस्ट अर्थात आज हा दिवस सेलिब्रेट केला जात आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन आठवडा पूर्ण झाला असून आठवड्याभरातच घरातील सदस्यांमधील मैत्रीचं नातं अलगद फुलताना दिसून येत आहे. आज रितेश भाऊच्या धक्क्यावरदेखील 'फ्रेंडशिप डे' साजरा होणार आहे. नव्या मैत्रीची नवीन समीकरणं प्रेक्षकांनादेखील पाहायला मिळणार आहे. फ्रेंडशिप डेनिमित्त 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर 'दोस्तीत कुस्ती आणि फुल ऑन मस्ती' पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा 'फ्रेंडशिप डे' स्पेशल प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घरातील सदस्य फ्रेंडशिप डेचं खास लॉकेट एकमेकांना देत 'मैत्री दिन' साजरा करताना दिसत आहेत. भित्रा मित्र, दगाबाज मित्र, खोटारडा मित्र, बालिश मित्र, डबल ढोलकी मित्र, असे वेगवेगळे लॉकेट सदस्य त्यांच्या मित्रांना घालताना दिसून येणार आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य एकमेकांच्या मागे बरंच काही बोलताना दिसून येतात. पण आज रितेश भाऊने त्यांना आमने-सामने उभं केलेलं पाहायला मिळेल. तसेच त्यांच्या मनातील पोलदेखील खोलेल.

रितेश देशमुखने शनिवारी झालेल्या 'भाऊचा धक्का'मध्ये सगळ्यांची जोरदार शाळा घेतली. प्रत्येक स्पर्धकाची यावेळी भाऊने चांगलीच शाळा घेतली. प्रत्येकाच्या वागण्या बोलण्यावरून आणि खेळण्याच्या स्ट्रेटेजीवरून कानउघडणी केली. निक्कीच्या वागण्यावर तिला सुनावलं तर जान्हवी आणि अंकितालादेखील चांगलंच धारेवर धरलं. या आठवड्यात सुरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर यांना जास्त मतं मिळाल्यामुळे ते दोघेही सेफ झाले. धनंजय पवार, अंकिता वालावलकर, योगिता पवार आणि पुरूषोत्तम पाटील यांच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT