Bigg Boss Marathi Episode Update  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: कोण आहे 'बिग बॉस'च्या घरातील देवदास? ज्याच्याविषयी रंगली आहे तेजस्विनी, अमृता आणि किरण यांच्यामध्ये चर्चा

'बिग बॉस'च्या घरातील देवदास सदस्य बाकीच्या सदस्यांसोबत गेम खेळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4 Episode Update: 'बिग बॉस मराठी 4' सुरू होऊन पाच आठवडे झाले आहेत. 'बिग बॉस' या कार्यक्रमाची ओळख एक वादग्रस्त शो अशी आहे. या कार्यक्रमात अनेक गोष्टी होत असतात. कोणती व्यक्ती खरी आहे आणि कोण खोटे, हे समजणे खूप कठीण आहे. परंतु घरापासून दूर असलेल्या या स्पर्धकांमध्ये 'बिग बॉस' जिकंण्यासाठी चुरस बघायला मिळत आहे. 'बिग बॉस'च्या घरात खटके उडत असतात आणि त्याचे परिमाणही घरात दिसतात.

'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये आज काय होणार याची उत्सुकता सगळ्यांच असते. आज 'बिग बॉस'च्या घरामध्ये किरण, तेजस्विनी अमृता धोंगडे एका खास व्यक्तीबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. घरातील या व्यक्तीला त्यांनी देवदास असे नाव ठेवले आहे. तसेच हा देवदास सदस्य बाकीच्या सदस्यांसोबत गेम खेळत आहे असे या तिघांचे म्हणणे आहे. घरातील काही सदस्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे आणि घरत वावरत आहेत, असे तेजस्विनीला वाटते आहे.

तेजस्विनी या किरण आणि अमृताला सांगणार आहे की, त्याचा गेम आता कळला आहे मला. त्याला आपण कितीही ग्रुपमध्ये घेतलं ना... तरी मी किती एकटा आहे, मी किती प्रेमात आहे, मी किती दुःखी आहे, असे दाखवत तो गेम खेळत आहे आणि हा गेम त्याचा आहे. त्यावर किरण यांचे म्हणणे आहे की, मला माहिती आहे, पण हे चार - पाच आठ्वड्यानंतर नाही चालणार. त्यावर तेजस्विनी म्हणते की, मला हे तुम्ही सांगितल्यावर कळालं. ही फिल्म आहे, प्रत्येकाने आपापली भूमिका घेतली आहे. त्याने देवदासची भूमिका घेतली आहे. जर तो देवदास आहे तर त्याने देवदाससारखे प्रामाणिक राहावे. (Bigg Boss Marathi)

ही चर्चा कोणाबद्दल होत आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. आता या देवदासच पूढे काय होणार? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. त्यामुळे 'बिग बॉस'च्या या रंजक घरामध्ये कोणते फासे कधी फिरतील हे सांगता येत नाही. जिंकण्याच्या या शर्यतीत कोणाचे मुखवटे उतरणार आणि कोणती नाती तुटणार हे येणार भागात आपल्याला कळणार आहे. (TV)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng : तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच बाजी मारणार, एजबॅस्टननंतर लॉर्ड्सवरही इंग्लंडचा संघ फेल होणार; फक्त...

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतून वाचला विश्वास कुमार, पण मानसिक धक्क्याने हदरला

Itchy Nose Relief: नाकात वारंवार खाज येते? 'या' उपायांनी घरच्या घरी सहज आराम मिळवा

Skin Care: मेकअपशिवाय मिळवा नेचरल पिंक ग्लो, फोलॉ करा या टिप्स

Food Infection: फूड पॉइजनिंगची लक्षणं कोणती? तब्येत बिघडल्यावर कशी काळजी घ्याल?

SCROLL FOR NEXT