Bigg Boss Marathi Latest Updates Instagram/ @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात जबरदस्त राडा होणार, अमृता आणि तेजस्विनीची नवी स्ट्रॅटेजी

आज बिग बॉसच्या घरात "खुल्ला करायचा राडा" हे साप्ताहिक कार्य सदस्यांवर सोपवले असून त्याचसाठी तेजस्विनी आणि अमृता धोंगडे नवी खेळी आखताना दिसणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Martahi 4: बिग बॉसचे घर म्हणजे कुस्तीचा आराखडा. इथे फक्त शारीरिक नाही बौद्धिक आणि भावनिक कुस्ती खेळली जाते. बिग बॉस जेव्हा टास्क देतात त्यावेळी स्पर्धकांना शारीरिक कुस्तीसोबत बौद्धिक कुस्तीही तिथे खेळली जाते. प्रत्येक स्पर्धक स्वत: वेगळा प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक स्पर्धकाची खेळी वेगळी असते. बिग बॉसच्या घरात कोणते नाते कधी संपेल याची खात्री कोणालाच देता येणार नाही. वाईल्ड कार्डमध्ये एन्ट्री मिळालेल्या स्नेहलताने नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांना नाराज केले आहे.

घरातील प्रवास जसजसा पुढे जात आहे, तसे अवघट टास्क पुढे येत आहे. या कठीणातल्या कठीण टास्कमध्ये स्पर्धकांना आपली ताकद आणि डोकं सगळ एकत्रच वापरायचे आहे. नुकत्याच पार पडलेल्या चावडीवर बऱ्याच स्पर्धकांची महेश मांजरेकरांनी कान उघडणी केली, ही कान उघडणी प्रत्येक स्पर्धकासाठी दिशादर्शक ठरत असते. आज बिग बॉस यांनी "खुल्ला करायचा राडा" हे साप्ताहिक कार्य सदस्यांवर सोपवले असून त्याचसाठी तेजस्विनी आणि अमृता धोंगडे नवी खेळी आखताना दिसणार आहेत.

तेजस्विनी आणि अमृता या दोघीही नव्या खेळाचा मास्टर प्लॅनही आखताना दिसत आहेत. या मास्टर प्लॅनमध्ये कोण आत जाणार ? कोण सामान आणणार ? कोण टार्गेट करणार ? याविषयीच्या चर्चा दोघींमध्ये प्रामुख्याने होत असल्याचे दिसून येत आहे. यावरुन घरात कोणता नवा वाद होणार हे आज कळेल. शेअर झालेल्या प्रोमोमध्ये दिसतंय की, मिरचीची धुरी, पाणी, तेल या सगळ्याचा वापर करत घरातले सदस्य आजचा टास्क खेळणार आहेत. टास्कसाठी दोन्ही टीम आपापल्या रणनीती आखत आहेत.

आजच्या भागामध्ये तेजस्विनी आणि अमृताची नवी स्ट्रेटेजी किती कामी येणार?, आजच्या भागात कोणाचा कोणासोबत वाद होणार? कोणती टीम जिंकणार आणि बिग बॉसच्या घरात स्नेहलता वसईकरची वाइल्ड कार्ड एंट्री झाल्यानंतर नवे समीकरणे काय बनणार हे पाहणं खूपच महत्वाचे ठरणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Vipreet Rajyog 2025: 28 नोव्हेंबर रोजी मीन राशीत मार्गी होणार शनी; विपरीत राजयोगामुळे मिळणार पैसाच पैसा

Local Body Election : राज्यात मोठी राजकीय उलथापालथ? २८८ पालिका-पंचायतींसाठी स्थानिक नेतेच ठरवणार उमेदवार

Ladki Bahin Yojana KYC: उरला फक्त आठवडा! लाडक्या बहिणींनो आजच eKYC करा, अन्यथा ₹१५०० विसरा

Maharashtra Weather Update : पुणे महाबळेश्वरपेक्षा थंड, धुळ्यात पारा ८.६ अंशावर; राज्यात थंडीची जोरदार एंट्री

SCROLL FOR NEXT