Bigg Boss Marathi 4 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: 'कोणाची लायकी काढतोस तू'; बिग बॉस मांजरेकर किरण मानेवर का संतापले?

बॅग घेऊन बाहेर काढीन तुला", अशा शब्दात महेश मांजरेकर यांनी किरण मानेला सुनावले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4 Update: 'बिग बॉस मराठी' म्हणजे वादविवाद, भांडण, मैत्री, नाती अनुभवण्याचे एकमेव ठिकाण आहे. 'बिग बॉसच्या घरामध्ये दररोज अनेक गोष्टी घडत असतात. 'बिग बॉस'च्या घरामध्ये स्पर्धकांची दिवाळी भन्नाट साजरी झाली. गिफ्ट, फराळ, पाहुणे अशी सगळ्याची मौज होती.

'बिग बॉस मराठी' सुरू होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. तरीही स्पर्धकांमध्ये मतभेद कायम आहेत. या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्क दरम्यान चांगलाच राडा झाला. चौथ्या आठवड्यात अक्षय केळकर कॅप्टन झाला आहे. अक्षयच्या नेतृत्वाखाली 'बिग बॉसचे घर कसे असेल हे पाहण्याची सर्वांच उत्सुकता लागली आहे.

आज चौथ्या आठवड्याची चावडी भरणार आहे. या चावडीवर महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेणार हे निश्चित आहे. परंतु नुकत्याच समोर आलेल्या कलर्स मराठीच्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर किरण मानेवर प्रचंड संतापलेले दिसत आहेत. किरण मानेने महेश मांजरेकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे हे सगळं घडलं आहे. (Bigg Boss Marathi)

"माने मी सगळं सगळं बघतोय इथे, सगळेच खेळायला आले आहेत. इथे कोणावर पर्सनल दुश्मनी नाहीये. मी काय त्यांना रोल फेकतो? मी काय इथे रोल फेकायला आलोय? कोणाची लायकी काढतोस तू, अरे तू काय आहे ते मला सांग. बॅग घेऊन बाहेर काढीन तुला", अशा शब्दात महेश मांजरेकर यांनी किरण मानेला सुनावले आहे. (Mahesh Manjrekar)

किरण मानेच्या बाबतीत काय निर्णय घेतला जातोय हे आजच्या भागात आपल्याला कळेल. महेश मांजरेकरांनी चावडीवर अजून कोणाची शाल घेतली आणि कोणाला मिळाली कौतुकाची थाप यासाठी आपल्याला आजचा आणि उद्याचा भाग पाहावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांच्या ईच्छेविरूद्ध जमिनी घेऊ नका; विजय वडेट्टीवार यांचा सरकारला इशारा

Plain Saree Styling Tips: प्लेन साडीमध्ये दिसाल एकदम स्टायलिश, या 5 फॅशन टिप्स करा फॉलो

Electricity In Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वीज बिल होणार कमी, नवे दर काय असतील?

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचं तडकाफडकी निलंबन

सरकारी योजनेसाठी जिवंत लोकांना मृत दाखवलं; 7 जणांच्या घरी नोटीस धडकली, कोणी केलं कांड?

SCROLL FOR NEXT