Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट, आणखी एकाला काढणार घराबाहेर, टॉप 5 मध्ये कोण कोण?

Bigg Boss Marathi 5 : आता बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक उरले आहेत. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा शेवटचा आठवडा फारच खास आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना एक एक धक्का मिळत आहे. नुकताच एव्हिक्शन टास्कमध्ये बिग बॉसच्या घरातील वर्षा उसगांवकर घराबाहेर गेल्या आहेत. आता बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक उरले आहेत. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

बिग बॉस घरात स्पर्धकांना धक्का मिळणार आहे. प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहे की, बिग बॉस मराठीच्या या पर्वातील टॉप ६ फायनलिस्ट मी जाहीर केले आणि इथेच येतो आहे ट्विस्ट. आता आपल्याला कळेल कोण आहेत टॉप ५” अशी घोषणा बिग बॉस करतात. ही घोषणा ऐकून सदस्यांना धक्का बसतो, असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर व अंकिता प्रभू वालावलकर हे सहा फायनलिस्ट आहेत. यांच्यापैकी एक जण आज घराबाहेर जाणार, याचदरम्यान बिग बॉसच्या घरातून आता कोण स्पर्धक घराबाहेर जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिग बॉस मराठीचा शेवटचा आठवडा असून 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

SCROLL FOR NEXT