Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात नवा राडा; अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट, नेमकं काय झालं?

Bigg Boss Marathi New Promo: बिग बॉसचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा ५ वा सीझन चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस या शोचा चौथा आठवडा सुरू आहे. बिग बॉसच्या घरात रोज नवीन नवीन टास्क शोमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.नुकताच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये टीम A आणि टीम B मध्ये नॉमिनेशनसाठी बिग बॉसच्या घरात राडा झाला. आता बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून टीम A मध्ये भांडणं होताना दिसत आहे. त्यातच आता वादाची नवीन ठिणगी म्हणजेच अरबाज आणि निक्कीमध्ये बाचाबाची होताना दिसत आहे. निक्की अभिजीत सावंतशी बोलतेय हे अरबाजला आवडत नाही आहे. असाच एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.

या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता, अरबाज निक्कीला म्हणत आहे,"तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला". असं म्हणतोय अनिक्की पुढे अभिजीतला म्हणते,"त्याचं म्हणणं हेच आहे की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत. तर तू का नाही आहेस?". तर दुसरीकडे अरबाज अंकिताला म्हणतो,"अभिजीत समोर असेल तर कृपया मध्ये येऊ नकोस. आता मी भिडणार". निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे कोण कोणाच्या विरोधात तसेच कोणाला कोणाच्या मैत्रीचा त्रास होतो आहे हे आज बिग बॉसच्या घरात पाहणं महत्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT